भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्याकडून खंडणी उकळणारा कोण? पोलीसांनी ठोकल्या बेड्या इतर संशयित फरारच
नाशिक शहरातील सातपुर पोलिस ठाण्यात दोन वर्षांपासून नागरे यांच्याकडे खंडणी मागितली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले होते, त्यात घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न ही झाला होता.
नाशिक : राज्य स्तरावरील भाजपचे नेते विक्रम नागरे यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या रोशन काकड या मुख्य संशयिताला नाशिक पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. नाशिकच्या सातपुर परिसरात राहणाऱ्या विक्रम नागरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच दरम्यान विक्रम नागरे यांच्या घरावर देखील काही संशयितांनी दगडफेक केली होती. यावरून सातपुर पोलीसांनी तपास करत असतांना रोशन काकड याला अटक केली असली तरी जया दिवे, दीपक भालेराव यांच्यासह आणखी सहा ते सात संशयित मात्र फरार आहे. 1 जानेवारी 2020 ते 30 ऑक्टोबर 2022 या काळात नागरे यांच्या जीवे ठार मारण्याची धमकी देत पैसे उकळण्यात आले होते. यामध्ये जवळपास पंधरा जणांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणातील अनेक संशयित आरोप यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याने मोक्काची कारवाई होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरातील सातपुर पोलिस ठाण्यात दोन वर्षांपासून नागरे यांच्याकडे खंडणी मागितली जात असल्याचे तक्रारीत नमूद केले होते, त्यात घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न ही झाला होता.
विक्रम नागरे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी उकळणारे संशयित आरोपी यांच्यावर प्राणघातक हल्ले, खून आणि जबरी चोऱ्या असे विविध गुन्हे दाखल आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत मुख्य संशयितांसह तिघांना अटक करण्यात आली आहे, उर्वरित संशयित मात्र अद्यापही फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.
दोन वर्षांपूर्वी तक्रारदार विक्रम नागरे आणि संशयित आरोपी रोशन काकड यांचे चांगले संबंध होते, त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नागरे यांनी तक्रार कशी दिली ? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.
सातपुर परिसरात या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू असून विक्रम नागरे प्रकरणात पोलीसांच्या कारवाईत आणखी काय समोर येते याकडे राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागून आहे.