पतीला गर्लफ्रेंड सोबत पत्नीने रंगेहात पकडले, मग काय पोलीसांसमोरच धुलाई, Video Viral
हल्ली सोशल मिडीयावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात आता एका महिलेने तिच्या पतीला रंगेहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रीया आलेल्या आहेत.
पती आणि पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यांनी बांधलेले असते. परंतू या दोघांपैकी एक जणही जर या विश्वासाला पात्र झाला नाही तर हे नातं काचेच्या भांड्याप्रमाणे तुटते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील हापूर शहरात घडला आहे. या शहरात एका इसमाला त्याच्या पत्नीने घरात दुसऱ्या एका महिलेबरोबर पाहीले. त्यानंतर या महिलेचा संताप अनावर झाला. त्या महिलेचे काय झाले हे माहिती नाही परंतू पोलिसांसमोरच पत्नीने आपल्या पतीच्या कानशिलात लगावली. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील हापूर शहरात पती आणि पत्नीच्या भांडणाचा हाय व्होल्टेज ड्रामा घडला आहे. पतीला एका पत्नीने रंगेहात बाहेरख्याली करताना पकडले आहे. त्यावेळी पत्नीने या पतीला सर्वांसमोर कानाखाली लगावल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्सवरील @gharkekalesh या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रीया वाचायला मिळत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
Extra-marital affair kalesh (The wife caught her husband red handed with his girlfriend. The husband and wife fought in the presence of the police) Hapur UP pic.twitter.com/cDcJTyaM5j
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 7, 2024
समाजमाध्यमावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. हा व्हिडीओ हापूर शहरातील आहे. या व्हिडीओ एका व्यक्तीला त्याची पत्नी रंगेहात एका महिलेसोबत पकडते. त्यानंतर या इसमाच्या पत्नीला प्रचंड राग येतो. ती पोलिसांच्या समोरच आपल्या पतीच्या कानाखाली खेचते. त्यानंतर हा पतीही उलट होऊन तिलाही मारायला पाहतो. तेवढ्यात पोलिस या दोघांच्या मध्ये पडतात. अन्यथा दोघामध्ये आणखी मोठी मारामारी पाहायला मिळाली असती अशा प्रतिक्रीया या संदर्भात सोशल मिडीयावर या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.