‘कन्हैया त्याला संपव मी कायमची तुझीच’; मुलगा हवा म्हणून महिलेचे तांत्रिकासोबत प्रेमसंबंध, राजस्थानला फिरायला, शेवट भयंकर वाईट!
Extramarital Affairs News : विवाहबाह्य संबंधांच्या अनेक घटना आता समोर येताना दिसत आहेत. मात्र यामुळे कित्येक चांगले संसार रस्त्यावर आलेत, अंधश्रद्धेमुळे बाहेर प्रेमसंबंध ठेवलेल्या महिलेसोबत शेवटी काय घडलं? जाणून घ्या.
लग्न झाल्यावरही पती किंवा पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं घरी समजल्यावर अनेक संसारांची राखरांगोळी झाल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. लग्नाला दहा-दहा वर्षे झाल्यावरही काही महिलांचे पर-पुरूषांसोबत विवाहबाह्य संंबंध असतात, अशी अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. मात्र ज्यावेळी भांडाफोड होते तेव्हा आपली चोरी लपवण्यासाठी जीवे मारायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे. सर्व काही प्लॅननुसार केलं होतं मात्र एक चूक नडली अन् त्यांचा भांडाफोड झाला. विवाहित महिला अंधश्रद्धेच्या बळी पडली आणि त्यानंतर तांत्रिकासोबत प्रेम संंबंध पण शेवट खूप वाईट झाला.
अनिल चौधरी नावाचा एक व्यावसायिक होता. त्याच्या पत्नी तनू चौधरी दोघांना दोन लहान मुली होत्या. सर्व काही सुरळित सुरू होतं. पण पत्नी तनूला एक गोष्ट कायम सलत होती ती म्हणजे तिला मुलगा हवा होता. यासाठी ती मंदिरात जाऊन देवाला प्रार्थन करत होती, यादरम्यान तिची ओळख एका तांत्रिकासोबत होती. या तांत्रिकाचे नाव कन्हैया असे होते. तूनचा आणि कन्हैयाचा संवाद वाढला आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. तनूला त्याने गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं होतं. पतीला खोटं बोलून ती त्याच्यासोबत राजस्थानलाही गेली होती.
दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल अनिलला काहीच माहिती नव्हती. मात्र पत्नीचं असं अचानर बाहेर जाणं, तिच्या नेहमीच्या वागण्यामध्येही बदल झाला होता. त्याला कन्हैया आणि तिच्याबद्दल संशय यायला लागला. अनिलने त्यानंतर तूनला बाहेर जायला आणि खासकरून कन्हैयाला भेटण्यासाठा मनाई केली. दोघांनाही राहवलं नाही, एकमेकांना भेटण्यासाठी दोघेही तळमळू लागले. दिवसेंदिवस तनूला हे काही सहन नाही झालं. तिने सरळ तांत्रिकाला म्हणजेच कन्हैयाला सांगितलं की, मला फक्त तुझंच राहायचं आहे. तुलापण मी हवी असेल तर त्यासाठी माझ्या नवऱ्याला संपव. तो मला खूप जास्त त्रास देऊ लागला आहे. त्याला मारलंस तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. जर तुला हे नसेल करायचं तर मला विसरून जा.
पत्नी तनूने प्रियकर कन्हैयाला सरळ सरळ आपल्याच पतीला मारायला सांगितलं होतं. त्यानेही आपल्या दोन मित्रांना घेऊन कट रचला. दोघांना दारू पाजली आणि अनिल चौधरीच्या घरी गेली. तनूने दार उघडं ठेवलं होतं, आतमध्ये येऊन त्यांनी अनिलला संपवलं. मात्र कन्हैयासोबत आलेला एकजण नशेमध्ये असल्याने त्याचा चाकू लागून मृत्यू झाला. हे दोन्ही खून दरोडा घालण्यासाठी आल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना अनिलच्या मुलीने दिलेली माहिती आणि मिळलेल्या पुराव्यांवरून कन्हैयाची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने तनू आणि दोघांनी त्याला कट रचून मारल्याचं कबूल केलं.
दरम्यान, या घटनने सगळेच हादरले, कारण सर्व काही सुरळीत असताना पत्नीच्या मूर्खपणामुळे अनिल चौधरीचा जीव गेला. दोन मुलींनी आपला बाप गमावला. ही घटना यूपीच्या मुरादाबाद येथे घडली आहे. पोलिसांनी कन्हैया आणि पत्नी तनू चौधरीला अटक केली आहे.