विवाहित महिलेचं अल्पवयीन मुलाशी जुळलं, मुंबईला पळून गेलेही; पण…
प्रेम कधी कोणाशी होईल काही सांगता येत नाही. एका 36 वर्षीय विवाहित महिलेचं एका 15 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघंही प्रेमात बुडाल्यानंतर मुंबईला पळून जाण्याचा प्लान आखला. झालंही तसंच पण शेवटी झालं असं की माघारी परतावं लागलं.
विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक गुन्हे घडल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. कधी हत्या, तर कधी आणखी काही झाल्याचं पोलीस तपासात उघड होतं. कोणताही गुन्हा घडला की पोलीस तपासात संशयाची सूई आधी या घटनांकडेच वळते. असाच पण काहीसा वेगळा विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेचं एका 15 वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध जुळले होते. महिला पती आणि मुलांसबोत घरी राहात होती. तर प्रेमसंबंध जुळलेला अल्पवयीन मुलगा घराजवळच राहात होता. दोघं कायम एकमेकांशी बोलायचे. त्यांच्यात चर्चा व्हायची. असं बोलता बोलता त्यांच्यात एक नातं तयार होत गेलं आणि प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरही सोडलं आणि पळून जाण्याचा निश्चय केला. दोघांकडे काही पैसे होते आणि त्यांनी तेथून मुंबईला जाण्याचा प्लान आखला. थोडेफार पैसे असल्याने मुंबईत पोहोचले आणि काही दिवस राहिले. पण त्यानंतर पैसे संपल्याने निर्माणाधीन साईटवर राहावं लागलं.
दुसरीकडे, दोघांच्या घरच्यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासही सुरु केला होता. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर दोघांचं जगणं कठीण झालं. हातात असलेले पैसे संपले होते. शेवटी त्यांना घरी परतण्याशिवाय पर्याय उरला नाही. दोघं घरी आल्यानंतर महिलेच्या पतीने पहिल्यांदा पोलिसात धाव घेतली आणि घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास केल्यानंतर समजलं की, दोघंही संमतीने गेले होते. मुलगा अल्पवयीन होता. त्यामुळे महिलेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिलेचं स्थिती आणखी कठीण झाली आहे.
नाशिकमध्ये सध्या या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सखोल चौकशी करत आहेत. प्रेमप्रकरणच आहे की आणखी या याचा उलगडा करण्याचा प्रयत्न देखील पोलीस करत आहेत.