Kalyan Crime : पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळले, मग पोलीस पतीने जे केले त्याने सर्व हादरले !

पती-पत्नीमध्ये दररोज भांडण व्हायचे. हे भांडण विकोपाला गेले आणि भलतंच घडले. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.

Kalyan Crime : पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळले, मग पोलीस पतीने जे केले त्याने सर्व हादरले !
वैवाहिक वादातून पतीचे टोकाचे पाऊलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 4:27 PM

कल्याण / 31 जुलै 2023 : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीच्या वादातून पतीने जे केले त्याने एकच खळबळ उडाली आहे. पतीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. विकान माने असे पीडित पतीचे नाव असून, तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या विकास माने यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. सध्या कुणालाही अटक वगैरे करण्यात आली नाही. पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे

कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीत विकास माने हे आपल्या कुटुंबासह राहतात. विकास ठाणे पोलीस दलात कार्यरत आहेत. विकास आणि त्यांच्या पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असे. याच भांडणातून पत्नी धमकी द्यायची आणि दबाव टाकत होती. याच वादाला कंटाळून विकास यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, विकास माने यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विकासच्या पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध सुरु होते. याबाबत विकास यांना कळल्यानंतर त्यांनी पत्नीला माहेरी सोडले. यामुळे पत्नी तिच्या माहेरचे विकास यांना धमकावत दबाव टाकत होते. याप्रकरणी विकास यांच्या कुटुंबीयांचा आणि विकास यांचा जबाव नोंदवत पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पतीवर खाजगी रुग्णलयात उपचार सुरु

विकास यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. महात्मा फुले पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. नातेवाईकांकडून सखोल तपासाची मागणी करण्यात येत आहे. तपासानंतरच सर्व माहिती उघड होईल.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.