Fake IPL चा लाईव्ह थरार! शेतात बनवले स्टेडिअम, मजुरांना बनवले क्रिकेटर, पीचवर उभे केले नकली अंपायर गुजरातमध्ये बनावट IPL
गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे कनेक्शन थेट रशियाशी आहे. रशियातील ट्व्हर, वोरोनेज आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना या फेक IPLच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे.
अहमदाबाद : एखाद्या चित्रपटही फिका पडेल असा ड्राम गुजरातमध्ये पहायला मिळाला आहे. बनावट क्रिकेट लीग, बनावट मैदान, बनावट क्रिकेटपटू पण त्यावर सट्टा लावणे खरे. विशेष म्हणजे यावर सट्टा लागला तो थेट परदेशातून. वाटतयं ना सगळ एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारख. मात्र, ही कुठल्या पिक्चरची स्टोरी नाही तर हे सर्व खरं आहे. गुजरातच्या वडनगरमधील एका गावात अनेक दिवसांपासून आयपीएलचे बनावट क्रिकेट लीग चालवले जात होते(Fake IPL In Gujrat). या फेक IPLचा लाईव्ह थरार दाखवला जात होता. HD कॅमेऱ्याने या मॅचचे रेकॉर्डिंग करुन यु ट्यूबवर LIVE प्रेक्षेपणही केले जात होते. गुजरात पोलिसांनी बनावट आयपीएल रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरुद्ध फसवणूक, सट्टेबाजी व इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा फरार आरोपी रशियात राहत असून तेथूनच तो सट्टेबाजीचे संपूर्ण रॅकेट हँडल करत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
पंधरवड्याहून अधिक काळ आयपीएल असल्याचे भासवत यूट्यूब चॅनलवर बनावट क्रिकेट सामने थेट प्रक्षेपित केले जात होते. गावातील शेतमजूर आणि बेरोजगार तरुणांना तयार करून चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचे टी-शर्ट घालायला दिले. वॉकी-टॉकी आणि पाच एचडी कॅमेरेही वापरले. यासोबतच मॅच ऑथेंटिक होण्यासाठी ‘अॅम्बियन्स साऊंड’ देखील जोडण्यात आला होता. हर्षा भोगलेची नक्कल करण्यासाठी मेरठमधील एका समालोचकाला पण आणले होता. या मॅचेसची टेलिग्राम चॅनेलवर थेट सट्टेबाजी सुरू होती.
गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलचे कनेक्शन थेट रशियाशी आहे. रशियातील ट्व्हर, वोरोनेज आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना या फेक IPLच्या जाळ्यात अडकवण्यात आले होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग हे संपूर्ण जगातील सर्वांत मोठे लीग समजले जाते. या लीगमध्ये अनेक परदेशातील खेळाडूंचा सहभाग असतो. मात्र, हे सर्व अधिकृत मार्गाने सुरू असते. परंतु गुजरात मध्ये झालेल्या या IPLमध्ये क्रिकेटरपासून अंपायरपर्यंत सगळेच बोगस असल्याचे उघडकीस आले आहे.
वडनगरच्या मॉलीपूर गावात काही लोकांनी खास या फेक IPL साठी एक शेत विकत घेतले होते. या शेताला त्यांनी क्रिकेटचे मैदान बनवले. येथे फ्लड लाइट्स लावण्यात आले आणि ग्राऊंडही तयार करण्यात आले. मल्टी कॅम सेटअप, कॉमेंट्री बॉक्ससह सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून ते संपूर्ण आयपीएलसारखे दिसेल. इतकेच नाही तर हा सामना मोबाईल अॅपवरही लाईव्ह दाखवण्यात आला होता. गावातील काही तरुण मंडळींना मॅच खेळण्याच्या कामावर ठेवले होते, त्यांना प्रत्येक सामन्यासाठी 400 रुपये दिले जायचे. स्थानिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रशियात बसलेला व्यक्ती सर्व व्यवस्था करत असे आणि त्याच्या सांगण्यावरून हा सर्व खेळ रचण्यात आला होता.