Gold: कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सोनं लिलावात काढलं, पिशव्या उघडल्यावर आढळले बेंटेक्सचे दागिने

Fake Gold | हे सोने पिशव्यांमधून बाहेर काढण्यात आले. तेव्हा पहिल्या पाच पिशव्यांमध्ये बेंटेक्सचे सोने असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. या प्रकारामुळे उपस्थित सभासद, बँक प्रशासक आणि लिलावात सहभागी झालेल्या सोनारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Gold: कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सोनं लिलावात काढलं, पिशव्या उघडल्यावर आढळले बेंटेक्सचे दागिने
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 1:13 PM

अहमदनगर: कर्ज न फेडल्यामुळे लिलावात काढण्यात आलेले सोने (Gold) बनावट निघाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. येथील नगर अर्बन बँकेत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Gold Fraud in Ahmadnagar Urban Bank)

हे सोने बँकेच्या शेवगाव शाखेत गहाण ठेवण्यात आले होते. मात्र, कर्ज न फेडल्यामुळे हे सोने लिलावात काढण्यात आले होते. नगर येथील मुख्य शाखेत सोन्याची लिलाव प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी हे सोने पिशव्यांमधून बाहेर काढण्यात आले. तेव्हा पहिल्या पाच पिशव्यांमध्ये बेंटेक्सचे सोने असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. या प्रकारामुळे उपस्थित सभासद, बँक प्रशासक आणि लिलावात सहभागी झालेल्या सोनारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या सगळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बँक आणि पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सोनं खरं की खोटं कसं ओळखाल?

सोनं खरेदी करण्यापूर्वी हे सोनं खरं आहे की बनावट आहे हे माहित असणं आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग आता अनिवार्य झाली आहे. याचा अर्थ आता आपल्याला खरे सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धतेची हमी आहे. परंतु, तरीही, जर एखादा सोनार आपली फसवणूक करीत असेल तर त्यास आपण स्वत: ला ओळखले पाहिजे. खरे आणि बनावट सोन्यामध्ये फरक करणे सोपे आहे.

यासाठी तुम्हाला बादलीत पाणी घ्यावे लागेल. आता त्यात सोन्याचे दागिने घाला, दागदागिने बुडाले तर मग सोनं खरं आहे हे समजून घ्या, जर ते काही काळ तरंगले, तर समजून घ्या की सोनं बनावट आहे. खरं तर, सोनं कितीही हलकं असलं तरी ते नेहमी पाण्यात बुडते.

व्हिनेगरच्या मदतीने देखील आपण सोने ओळखू शकता. सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब घाला, जर त्याचा रंग बदलला नाही तर ते खरं सोनं आहे. त्याच वेळी जर त्याचा रंग बदलला तर ते बनावट आहे. जर आपल्याला खरे सोने तपासायचे असेल तर अॅसिड चाचणीद्वारे सहज जाणून घेऊ शकता. यासाठी, आपण पिनच्या सहाय्याने थोडेसे सोन्यावर स्क्रॅच करा आणि नंतर त्या स्क्रॅचवर नायट्रिक अॅसिडचा एक थेंब टाका. बनावट सोने त्वरीत हिरवे होईल, तर वास्तविक सोन्यावर काही परिणाम होणार नाही.

संबंधित बातम्या:

सरकारचा मोठा निर्णय; सराफ व्यापाऱ्यांना कर्जाची रक्कम सोनं देऊनही फेडता येणार

PHOTO | काही क्षणात ओळखा खरं आणि बनावट सोने; घरगुती उपायांनीही करु शकता टेस्ट

Gold Price : सोने-चांदीचे दर किती कमी होणार? इंधनाची किंमत किती वाढणार? वाजा तज्ज्ञांची मतं

(Gold Fraud in Ahmadnagar Urban Bank)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.