अबब ! ईडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाखाच्या बनावट नोटा कुठून आल्या ?
नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवीच्या यात्रा उत्सव काळात विक्रेत्यांना बनावट नोटा दिल्याची माहिती विक्रेत्यानी पोलीसांना दिली होती.
Nashik Crime : नाशिकमध्ये मुंबई नाका पोलीसांनी (Nashik Police) केलेल्या एका कारवाईने खळबळ उडाली आहे. इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाखांच्या बनावट नोटा (Fake Currency) सापडल्या आहेत. एका इडली विक्रेत्याला मुंबई नाका पोलीसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलीसांना आला असून त्यांच्या मागावर नाशिक पोलिसांचे पथक आहे. दोन आणि पाचशेच्या पाच लाखांच्या बनावट नोटा एका इडली विक्रेत्याकडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक शहर पोलीसांना पाच लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात यश आल्याने मुंबई नाका पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवीच्या यात्रा उत्सव काळात विक्रेत्यांना बनावट नोटा दिल्याची माहिती विक्रेत्यानी पोलीसांना दिली होती.
त्याच माहितीच्या आधारे पोलीसांनी तपास सुरू केला होता. त्याच काळात सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांना काही संशयित आढळून आले होते.
त्यात इडली विक्रेता असल्याचे आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना अटक करत त्यांची कसून चौकशी केली असून त्यात बनावट नोटा आढळून आल्या आहेत.
बनावट नोटांमध्ये दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश असून तब्बल पाच लाखांच्या रकमेच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत.
ही प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांनी दिली असून लवकरच याबाबत मोठी टोळी पोलीसांच्या तपासातून समोर आणली जाणार असल्याची माहिती आहे.
या कारवाईमध्ये इडली विक्रेते पोलीसांच्या रडारवर असून सकाळपासूनच इडली विक्रेत्यांची धरपकड मोहीम सुरू असून कसून चौकशी केली जात आहे.