मोठी बातमी : प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसच्या माजी अध्यक्षांनी स्वत:ला संपवलं, सापडलेल्या चिट्ठीमध्ये काय?

दिल्लीमधून खळबळजनक बातमी समोर आलीये. प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसच्या माजी अध्यक्षांनी राहत्या घरात स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडली आहे, त्यामध्ये काय म्हटलंय जाणून घ्या.

मोठी बातमी : प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसच्या माजी अध्यक्षांनी स्वत:ला संपवलं, सापडलेल्या चिट्ठीमध्ये काय?
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 8:08 PM

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी आपले जीवन संपवले आहे. 3 सप्टेंबर मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. दिल्लीमधील अब्दुल कलाम लेन परिसरामध्ये ही घटना घडली आहे. सलील यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना एक चिट्ठी मिळाली आहे. या चिट्ठीमध्ये चार जणांची नावे असून त्यांनी छळ केल्याचा आरोप त्यामध्ये केल्याची माहिती समजत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील कपूर यांच्या तीन मजली घरात ग्राऊंडफ्लोरलाच त्यांचा मृतदेह आढळला.कपूर यांच्या घरच्यांना पूजा घराच्याजवळ त्यांचा मृतदेह रक्तान माखलेल्या अवस्थेत दिसला. काही वेळातच त्यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस फॉरेन्सिकज्ञांसह फिंगरप्रिंट्स काढण्यासाठी घटनास्थळी भेट दिली. एक धक्कादायक बाब म्हणजे सलील कपूर यांच्या वहिणी नताष कपूर यांनीही 2020 मध्ये आपले जीवन संपवले होते.

सलील कपूर हे 9 कोटी रूपयांच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपी होते. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. सलील कपूर यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिट्ठीमध्ये चार लोकांची नावे आहेत. ते चार लोक कोण याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, त्यामध्ये हे लोक मानसिक शारीरिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.