छोट्या भावाला बाय करून ती गल्लीत पोहोचली तोच धापकन आवाज आला आणि एकच कल्लोळ उठला.. तिथे नेमकं काय घडलं ?

एक मुलगी तिच्या छोट्याशा भावाला बाय करून कामासाठी खाली उतरली. ती गल्लीत पुढे जाते न जाते तोच धप्पकन आवाज आला आणि एकच गदारोल माजला. तिने मागे वळून पाहिलं आणि समोरच दृश्य दिसल्यावर ती गोठूनच गेली.

छोट्या भावाला बाय करून ती गल्लीत पोहोचली तोच धापकन आवाज आला आणि एकच कल्लोळ उठला.. तिथे नेमकं काय घडलं ?
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 11:51 AM

फरीदाबाद | 5 ऑक्टोबर 2023 : आयुष्य अतिशय बेभरवशी आहे. कधी काय घडेल याचा भरवसा नाही, आत्ता हसता-खेळता असणारा माणूस पुढच्याच क्षणी निश्चल होऊ शकतो. आपण मारे भविष्याचे प्लान्स, स्वप्न रंगवत असतो, पण पुढल्या क्षणाला काय होऊ शकतं याचा अंदाजच नसतो. याचीच एक दुर्दैवी झलक फरीदाबादमध्ये पहायला मिळाली.

एक मुलगी तिच्या छोट्याशा भावाला बाय करून कामासाठी खाली उतरली. ती गल्लीत पुढे जाते न जाते तोच धप्पकन आवाज आला आणि एकच कल्लोळ उठला. तिने पटकन मागे वळून पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून ती गोठूनच गेली. गल्लीतले सगळे जण गोळा झाले आणि सर्वांचे डोळेच विस्फारले.

तिथे नेमकं काय घडलं ?

हरियाणातील फरीदाबादमध्ये एका चिमुकला गॅलरीत तोल जाऊन खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेलं पण, तेथे पुरेशा सुविधा नसल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला जाण्यास सांगितलं. तेथे पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. थोड्या वेळापूर्वी हसत खेळत असलेला तो जीव निष्प्राण झाला होता.

फरीदाबादच्या डबुआ कॉलनीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील एक मुलगी कामासाठी खाली उतरली. तिचा छोटा, चार वर्षांचा भाऊ तिला बाय-बाय करण्यासाठी गॅलरीत उभा होता. अचानक त्याचा तोल गेला आणि दुसऱ्या मजल्यावरून तो थेट खालीच कोसळला. गल्लीत पुढे जाणाऱ्या बहिणीने तो आवाज ऐकून मागे पाहिलं तर तिचा लाडका छोटा भाऊ, रक्तबंबाळ होऊन, जखमी अवस्थेत जमीनीवर पडला होता. तिने त्याला लगेच कुशीत घेतलं.

ही घटना समजताच तिच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी तातडीने फरीदाबाद मधील बादशाह रुग्णालयात धाव घेतली. पण मुलाची अवस्था अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला जाण्याचा सल्ला दिला. मुलाच्या वडिलांकडे ईएसआय कार्ड होतं, त्यामुळे ते मुलाला उपचारांसाठी ESI येथे घेऊन गेले. मात्र तेथे उपचारांदरम्यान मुलाने अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टरांवर केला निष्काळजीपणाचा आरोप

मुलाच्या मृत्यूने कुटुंबिय शोकाकुल झाले. मुलाच्या वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी ईएसआय डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला . त्यांनी रुग्णालयात योग्य उपचार केले नाहीत. आम्हाला पाच मुलींनंतर एक मुलगा आहे, तो सर्वात लहान आणि एकुलता एक मुलगा होता. आता आम्ही कोणाकडे पहायचं, असा सवाल कुटुंबियांनी केला ाहे. तसेच उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.