Bhandara Crime | भंडाऱ्यात शेतमजुराची आत्महत्या; शेतातील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास
भंडाऱ्यात एका शेतमजुरानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहाडी तालुक्यातील (Mohadi Taluka) पांढराबोडी येथील ही धक्कादायक घटना आहे. धर्मपाल चव्हाण (Dharmapal Chavan) असं या शेतमजुराचं नाव आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर जातो, असं त्यांनी घरच्यांना सांगितलं.
भंडारा : भंडाऱ्यात एका शेतमजुरानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोहाडी तालुक्यातील (Mohadi Taluka) पांढराबोडी येथील ही धक्कादायक घटना आहे. धर्मपाल चव्हाण (Dharmapal Chavan) असं या शेतमजुराचं नाव आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर जातो, असं त्यांनी घरच्यांना सांगितलं. त्यानंतर सरळ शेत गाठलं. शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावला. घटनेची माहिती मिळताच आंधळगाव पोलीस ( Andhalgaon Police) घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू केला. धर्मपाल यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
बँकेचे कर्ज होते
धर्मपाल यांच्यावर बँकेचे कर्ज आहे. तसेच त्यांनी सरकारी अनुदानातून कर्जावरच उपजीविका करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी केले होते. कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली. कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्यानं त्यांनी हे आत्मघाती पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.
मृतदेह लटकलेला दिसला
धर्मपाल काल सकाळी शेतावर गेले. त्यानंतर ते परतलेच नाही. घरच्या लोकांना ते घरी का परतले नाही, याची काळजी वाटली. त्यांनी शेतावर जाऊन त्यांचा शोध घेतला. शेतात एक आंब्याचे झाड आहे. त्या झाडाला त्यांनी गळफास लावलेल्या अवस्थेत होता.
कर्ज माफ करण्याची मागणी
धर्मपाल यांच्या मृत्यनंतर घरी पत्नी आहे. शिवाय दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा कुटुंब आहे. धर्मापाल हे 46 वर्षे वयाचे होते. घरी कर्ते पुरुष होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आली आहे. कर्ज माफ करावी, अशी मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे.
Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है
Maharashtra News Live Update : रवी राणा नवनीत राणा मुंबईत दाखल, पोलिसांकडून दाम्पत्याचा शोध