Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUNE : भोरमध्ये सावकारी कर्जाच्या जाचामुळे, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका

ही घटना भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील असून राजगड पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सतीश शिळीमकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

PUNE : भोरमध्ये सावकारी कर्जाच्या जाचामुळे, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका
rajgad police station bhorImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 8:16 AM

पुणे – जिल्ह्यातील भोर (Pune Bhor) तालुक्यात सावकारी कर्जाच्या जाचामुळे शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer suicide) केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (Rajgad Police) दाखल झाली आहे. सतीश बाजीराव शिळीमकर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. सावकारी कर्जाच्या जाचामुळे आत्महत्या केली असल्यामुळे शेतकरी वर्गात घबराहटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पैसे देऊनही सावकार कर्जापोटी 28 लाख रुपये आणि जमीन नावावर करून देण्याची मागणी करत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. सतीश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कारण लिहिलं आहे.

सावकारी कर्जाच्या जाचामुळे सतीश बाजीराव शिळीमकर यांनी आत्महत्या केल्याची चिठ्ठी सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील असून राजगड पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सतीश शिळीमकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हे सुद्धा वाचा

सतीश बाजीराव शिळीमकर यांनी गावातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांनी ही घटना पोलिसांच्या कानावर घातली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह खाली उतरण्यात आला. त्यावेळी सतीश बाजीराव शिळीमकर यांच्या पॅंटच्या खिशात चिठ्ठी सापडली. अमृत शिळीमकर यांचे पैसे देऊनही ते कर्जापोटी 28 लाख रुपयांची मागणी करीत आहे. त्याचबरोबर जमीन नावावर करुन देण्याची धमकी देत आहे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीन चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा
राजीनामा द्या, नाहीतर..; मुख्यमंत्र्यांच्या धमकीनंतर मुंडेंचा राजीनामा.
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला
राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर
धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर.
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'
औरंगजेबाच्या कौतुकानंतर आता आझमींचा यु-टर्न, 'अपमान केला नाही पण...'.
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट
Video : देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हा सुन्न, 100% बंद.. एकच शुकशुकाट.
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा..
संतोष देशमुख हत्येचा निकाल 90 दिवसांत लावा, अन्यथा...
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट
'लाडक्या बहिणीं'नो Good News..सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट.
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका
हे सरकार अतिशय निगरगट्ट; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका.
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?
ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचं नाव फायनल?.
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका
आझमीचा DNA औरंगजेबाचा.., त्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्याची टीका.