Hingoli : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, घरातला कर्ता गेल्याने कुटुंबावर शोककळा

| Updated on: Sep 02, 2022 | 11:36 AM

पांडुरंग पानपट्टे यांच्या पश्चात लहान एक मुलगा, मुलगी पत्नी, आई वडील असा परिवार आहे. घराची संपूर्ण जबादारी शेतकरी पांडुरंग यांच्यावर होती.

Hingoli : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, घरातला कर्ता गेल्याने कुटुंबावर शोककळा
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
Image Credit source: tv9marathi
Follow us on

वसमत : ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत. म्हणून राज्य सरकारकडून (Maharashtra Government) अधिक निधी दिला जातो. पण तरीही जे व्हायचे ते होत असल्याचे समोर आले आहे. वसमत (Vasamat) तालुक्यातील वापटी (Wapti)येथील विहिरीत पडलेल्या शेतकरी मजुराला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आख्खं गाव संतप्त झालं आहे. ज्यावेळी रुग्णाला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिथं डॉक्टर नसल्यामुळे शेतकऱ्यांने रुग्णालयाच्या दरवाजात जीव सोडला आहे. पांडुरंग पानपट्टे मृत शेतकऱ्याच नाव आहे. पांगरा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी हजर नव्हते. ते तिथं नसल्यामुळे रुग्णाचा जीव गेला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या कामावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नेमकं काय झालं

ग्रामीण भागात नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासन अनेक उपाययोजना करताना दिसते. मात्र,कोट्यावधी रुपये खर्च करून देखील ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या प्राथमिक केंद्रांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी हजर राहत नाहीत. सामान्य जनतेला हालपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत, वसमत तालुक्यातील पंगरा शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळनंतर, वैद्यकीय डॉक्टर कर्मचारी हजर राहत नाहीत. उपचार अभावी वापटी गावातील पांडुरंग पानपट्टे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

नातेवाईकांचा डॉक्टरांवरती आरोप

शेतकरी पांडुरंग पानपट्टे हे शेतात काम करत असताना विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घासरून ते विहिरीत पडले. त्यांना विहिरीत पडतांना पाहून शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले. तसेच त्यांना पुढील उपचाराकरिता नजीक असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक केंद्रात हलवले. मात्र केंद्रात डॉक्टर हजर नसल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वैद्यकीय अधिकारी बराच वेळ होऊनही हजर होत नसल्याने, नातेवाईकांनी वासमत तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. वैद्यकीय अधिकारी पाठवले, पण तोपर्यंत उशीर झाला होता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली

पांडुरंग पानपट्टे यांच्या पश्चात लहान एक मुलगा, मुलगी पत्नी, आई वडील असा परिवार आहे. घराची संपूर्ण जबादारी शेतकरी पांडुरंग यांच्यावर होती. मात्र घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी पानपट्टे यांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टर हजर असते. तर शेतकरी पांडुरंग यांचा कदाचित जीव वाचला असता. मात्र डॉक्टर हजर असल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.