Nanded Crime : अल्पवयीन मुलीचा नात्यातील तरुणावर जीव जडला, पण वडिलांना हे नाते मान्य नव्हते, मग संतापलेल्या पित्याने थेट…

प्रेम करणे एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे. प्रियकराशी लग्न करण्याच्या हट्टापायी मुलीला कठोर शिक्षा भोगावी लागली आहे. घटना उघड होताच सर्वांनाच धक्का बसला आहे.

Nanded Crime : अल्पवयीन मुलीचा नात्यातील तरुणावर जीव जडला, पण वडिलांना हे नाते मान्य नव्हते, मग संतापलेल्या पित्याने थेट...
प्रेम प्रकरणाच्या वादातून पित्याने मुलीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:55 PM

नांदेड / 11 ऑगस्ट 2023 : प्रेमाला विरोध करुनही मुलगी प्रियकरासोबत लग्न करण्याचा हट्ट करत असल्याने संतापलेल्या पित्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. हत्या करुन आत्महत्या केल्याचा बनाव करत मुलीवर अंत्यसंस्कारही उरकले. मात्र आठ दिवसांनी पोलिसांना हत्येची कुणकुण लागली. पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आणि अखेर सत्य उजेडात आले. मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. अण्णाराव राठोड असे आरोपी पित्याचे नाव आहे. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही धक्कादायक घटना घडली. ही घटना उघड होताच गावात एकच खळबळ माजली.

काय आहे प्रकरण?

मयत मुलगी दहावीची विद्यार्थिनी होती. तिचे नात्यातील एका तरुणावर प्रेम जडले होते. मात्र मुलीच्या वडिलांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. वडिलांचा विरोध असूनही मुलगी सदर तरुणाशी लग्न करण्याचा हट्ट करत होती. यामुळे वडिलांना संताप अनावर झाला आणि त्यांनी कोयत्याने वार करुन मुलीची हत्या केली. हत्या केल्यानंतर घाईत मुलीवर अंत्यसंस्कारही केले. तसेच मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

मात्र आठ दिवसानंतर पोलिसांना या हत्याकांडाची कुणकुण लागली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. आरोपीने आधी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून तपास करत हत्याकांडाचा उलगडा केला. यानंतर आरोपी पित्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. घटना उघड होताच पोलिसांसह सर्वच चक्रावून गेले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.