त्यांचं कुटुंब वर्षानुवर्षे धोक्यात होतं, वडिलांच्या पेटीत होती ती स्फोटक वस्तू, आर्मीलाच बोलवावं लागलं…

क्यूबेक येथे राहणाऱ्या केड्रिन सिम्स ब्रॅचमन यांचा घरी अशी वस्तू सापडली की ज्यामुळे थेट आर्मीलाच बोलवावे लागले. केड्रिन हिचे वडिल फ्रँक यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. घरात साफसफाई करताना केड्रिन हिला वडिलांची एक जुनी पेटी सापडली.

त्यांचं कुटुंब वर्षानुवर्षे धोक्यात होतं, वडिलांच्या पेटीत होती ती स्फोटक वस्तू, आर्मीलाच बोलवावं लागलं...
old trunkImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 6:27 PM

नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : एका महिला आपल्या रूमची साफसफाई करत होती. साफसफाई करता असताना तिला तिच्या वडिलांची एक जुनी पेटी सापडली. वडिलांचं नुकतचं ऑक्टोबरमध्ये निधन झालं होतं. त्यामुळे वडिलांची ती जुनी पेटी पाहून मुलीला आनंद झाला. वडिलांच्या काही जुन्या आठवणी त्यामध्ये असतील असे समजून तिने ती पेटी उघडली. पण, त्यातील वस्तू पाहून तिचे हातपाय गळाले. दरदरून घाम फुटला. तिने पोलिसांना बोलावले. पोलीस ती वस्तू पाहून थक्क झाले आणि थेट आर्मीलाच त्या ठिकाणी बोलावले. ही घटना कॅनडातील क्यूबेक येथे घडलीय.

क्यूबेक येथे राहणाऱ्या केड्रिन सिम्स ब्रॅचमन यांचा घरी अशी वस्तू सापडली की ज्यामुळे थेट आर्मीलाच बोलवावे लागले. केड्रिन हिचे वडिल फ्रँक यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. घरात साफसफाई करताना केड्रिन हिला वडिलांची एक जुनी पेटी सापडली. तिने ती उघडली तेव्हा तिला त्यात जिवंत बॉम्ब असल्याचे दिसले.

केड्रिन हिने सावधपणा दाखवून पोलिसांशी संपर्क साधला. एक पोलिस अधिकारी त्यांच्या घरी आला तेव्हा त्याने तो जिवंत बॉम्ब पाहून कॅनेडियन सैन्याला घरी बोलावणे आवश्यक आहे असे सांगितले. त्याने कॅनेडियन आर्मीच्या सैनिकांना फोन केला. आर्मीचे जवान घरी पोहोचले. त्यांनी ग्रेनेड पाहिला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. कारण, इतके वर्ष जुने ग्रेनेड अजूनही जिवंत होते. त्याची पिन काढली तर त्याचा मोठा स्फोट झाला असता. लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड सुरक्षित ठेवून सोबत नेला.

केड्रिनने सांगितले की हा ग्रेनेड अनेक वर्षांपूर्वी आम्ही घरात पाहिला होता. पण, नंतर तो दिसला नाही. त्यामुळे तो वडिलांनी कुठेतरी नेला असावा असा आमचा समाज झाला होता. पण तो चुकीचा समज होता. हा जिवंत ग्रेनेड आजपर्यंत घरात ठेवण्यात आला होता. हा आमच्या जीवाला फार मोठा धोका होता असे तिने म्हटले.

सुमारे 30 वर्षांपूर्वी माझे वडील फ्रँक यांनी माझ्या आजोबांच्या घरून हा ग्रेनेड आणला होता. आम्ही सर्वांनी तो फेकून देण्तास सांगितले होते. नंतर तो ग्रेनेड दिसला नाही त्यामुळे ते फेकून दिले असावे असे वाटले. पण, त्यांनी तसे केले नव्हते. आम्ही अनेक वेळा घर बदलले. तेव्हा तेव्हा ती पेटी आम्ही सोबत नेली, हलविली पण त्यामध्ये ही वस्तू असेल असा आम्हाला कधीच संशय आला नाही. ती वस्तू आमच्या सामानात आहे हे आम्हाला माहितही नव्हते. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना घडू शकली असती असेही केड्रिन म्हणाली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.