Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला.

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 1:02 AM

यवतमाळ : सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव दवणे (वय 65, राहणार पंचशील नगर लोहारा) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

साहेबराव दवणे हे आपला मुलगा सून हिच्या बरोबर एकत्र राहत होते. ते एका ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये चौकीदारी करत होते. त्यांनी 4 बचतगटाचे कर्ज उचलून मुलगा सूरजचा विवाह नांदेड येथील संध्या हिच्याशी लावून दिला. संध्या लग्नानंतर नवीन सून बनून घरात आली. मात्र त्यानंतर तिने वृद्ध सासऱ्याला घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली. लग्नासाठी काढलेला कर्जाचा हप्ता नवऱ्याने भरू नये यासाठी नवऱ्यावर दबाव टाकत होती.

सुनेकडून सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी

सून संध्या सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. यामुळे साहेबराव दवणे यांना मानसिक धक्का बसला. या धक्क्यातूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिट्ठी खिशात लिहून ठेवली. या चिट्ठीवरून त्यांचा मुलगा सुरज साहेबराव दवणे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी संध्या सूरज दवणे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

हेही वाचा :

पतीनिधनानंतर विम्याच्या रकमेसाठी महिलेचा सासरी छळ, गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न

आईप्रमाणे सांभाळणाऱ्या सासूला अखेरचा निरोप, चार सुनांचा पार्थिवाला खांदा

वडील-बायकोच्या प्रेमसंबंधाची कुणकुण, जाब विचारल्याने मुलाची हत्या

व्हिडीओ पाहा :

Father in law suicide due to abuse of daughter in law in Yavatmal

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.