Nagpur Crime : जन्मदात्यानेच पोटच्या पोराबाबतच केले धक्कादायक कृत्य, पत्नीलाही दिली धमकी

महिला तिच्या मुलासह स्कूटीवरून जात असताना तिचा पती व साथीदार व्हॅनमधून आले आणि मुलाला उचलून घेऊन गेले. त्यांनी त्या महिलेला धमकीही दिली.

Nagpur Crime : जन्मदात्यानेच पोटच्या पोराबाबतच केले धक्कादायक कृत्य, पत्नीलाही दिली धमकी
पैशाच्या वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 10:59 AM

नागपूर | 9 ऑगस्ट 2023  :    रोजची भाडणं आणि जाचाला कंटाळून वेगळं राहणाऱ्या पत्नीला धमकी देत आपल्या पोटच्या पोराचेच पित्याने अपहरण (father kidnapped son) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी माहिती दिली. सोमवारी सकाळी तुलसीनगर भागात ही धक्कादायक घटना (crime news) घडली.

पीडित महिला तिच्या मुलासह स्कूटीवरून जात असताना, एका कारने त्यांचा रस्ता अडवला. कारमधून त्या महिलेचा पती आणि त्याचा साथीदार खाली उतरले आणि ते दोघेही तिच्या मुलाला घेऊन फरार झाले. मुलाचे अपहरण करताना आरोपी पतीने त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. अपहरण झालेल्या मुलाची आई अक्सा इद्रीस पारेख तातडीने पोलिसांकडे गेली आणि मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ शोधमोहिम सुरू केली असून मध्य प्रदेशातील खांडवा येथे आरोपीच्या घरीही पोलिसांचे पथक पाठवले आहे.

नक्की काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील खांडवा येथील रहिवासी आहे. 2019 साली अब्दुल आणि अक्सा यांचा निकाह झाला. मात्र त्यानंतर अब्दुल व त्याच्या घरच्यांनी अक्सा हिचा छळ करण्यास सुरूवात केली. याप्रकरणी अक्साच्या तक्रारीनंतर खंडवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर अक्सा तिच्या लहान मुलाला घएऊन नागपूर येथे माहेरी परतली. तिने अब्दुल याला घटस्फोटाची नोटीसही पाठवली.

मात्र घटस्फोटापूर्वीच अब्दुलने दुसऱ्या तरूणीशी लग्नही केले. महिन्याभरापूर्वी अब्दुलने अक्साला फोन केला होता आणि आपल्या मुलाला कसंही करून घेऊन जाईन, अशी धमकी तिला दिली. घटनेच्या दिवशी अक्सा मुलाला शाळेत सोडण्यास जात होती, तेव्हाच अब्दुलने संधी साधली आणि मुलाला हिसकावून घेतले. अक्साने विरोध दर्शवला असता, तिला जीवे मारण्याची धमकीही दिली आणि तो तेथून निघून गेला.

याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. अब्दुलचा मोबाईल बंद आहे. याप्रकरणाची माहिती खंडवा पोलिसांना देण्यात आली आहे. कायदेशीर बाबी तपासण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.