इन्स्टाग्रामवर मुलीची रील्स पाहिली, मग संतापलेल्या बापाने पुढे जे केले ते भयंकर !

बापाने मुलीचा इन्स्टाग्रामवर रील्स व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमुळे बापाला मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. मुलीला अनेकदा समजावूनही मुलगी प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हती.

इन्स्टाग्रामवर मुलीची रील्स पाहिली, मग संतापलेल्या बापाने पुढे जे केले ते भयंकर !
प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापाने मुलीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 3:47 PM

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलगी आणि पत्नीची गोळ्या झाडून हत्या करत पित्याने स्वतःचेही जीवन संपवले. बहिलपुरवा पोलीस ठाण्याच्या सेमरदहा गावात ही घटना घडली आहे. वडिलांनी इंस्टाग्रामवर एका मुलासोबत आपल्या मुलीचा रील्स व्हिडिओ पाहिला होता, त्यानंतर त्यांना मुलीच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. यामुळे रागाच्या भरात त्याने मुलगी आणि पत्नीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास सुरू केला. नंद किशोर त्रिपाठी असे मृत वडिलांचे नाव आहे.

रील्समुळे बापाला मुलीच्या प्रेमप्रकरणाची मिळाली माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर यांची मुलगी खुशी हिचे आपल्या आजोळच्या गावातील पंकज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. खुशीने त्या तरुणासोबत केलेल्या रील्समुळे नंदकिशोर यांना तिच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. नंदकिशोरकडून खुशीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. बदनामी टाळण्यासाठी नंदकिशोरने आधी मुलीला खूप समजावले, पण खुशी काही ऐकायला तयार नव्हती.

अनेकदा समजावूनही मुलगी प्रियकराला सोडायला तयार न्हवती

प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच नंद किशोरने खुशीला खडसावले होते. त्यानंतर खुशीने शनिवारी विष प्राशन केले. कुटुंबीयांनी तिला तात्काळ माणिकपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. या घटनेनंतर खुशीच्या आई आणि वडिलांनी तिला पुन्हा खूप समजावले. रविवारी सर्व काही व्यवस्थित पार पडले. त्यानंतर अचानक खुशीने ब्लेडने हातावर प्रियकराचे नाव लिहिले.

हे सुद्धा वाचा

सोमवारी सकाळी नंदकिशोरने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने खुशीला मारहाण केली. पण, ती प्रियकराला सोडायला तयार नव्हती. अखेर संतापलेल्या नंदकिशोरने बंदुक घेऊन खुशीच्या खोलीत घुसला आणि मुलीसह पत्नीला गोळ्या झाडल्या. यानंतर तो बंदूक घेऊन फरार झाला. शेजाऱ्यांनी दोघींनाही रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चित्रकूटच्या पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.