नात्याला काळिमा फासणारी घटना, कर्ज चुकवण्यासाठी बापाने जे केले ते पाहून संताप अनावर होईल !

बापाला दारुचे व्यसन होते. या व्यसनासाठी त्याने एका व्यक्तीकडून पैसे उधार घेतले होते. ते पैसे तो परत करण्यासाठी कर्जदार त्याच्या मागे लागला होता. मात्र पैसे परत करण्यास असमर्थ असल्याने त्याने जे केले ते नात्याला काळिमा फासणारं.

नात्याला काळिमा फासणारी घटना, कर्ज चुकवण्यासाठी बापाने जे केले ते पाहून संताप अनावर होईल !
कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने काळजाचा तुकडाच गहाण ठेवलाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 12:02 AM

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एका पित्याने आपल्या 4 वर्षाच्या मुलीला गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली. यानंतर त्याने कर्ज फेडल्यावर मुलीला सोडा, असे सांगितले. जयपूरमध्ये हा व्यक्ती त्याची पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहतो. तो रद्दीचे काम करतो आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. नशा करण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून काही पैसे उसने घेतले होते, जे तो परत करू शकला नाही.

सदर व्यक्ती पैसे करण्यासाठी आरोपीवर दबाव टाकत होती. मात्र तो पैसे करु शकत नसल्याने त्याने हे घृणास्पद कृत्य केले. घटना उघडकीस येताच सर्वांनाच धक्का बसला आहे. मुलीकडून भीक मागून पैसे वसुल करा, असे सांगून त्याने आपली मुलगी कर्जदाराच्या स्वाधीन केली.

‘असा’ झाला खुलासा

बापाच्या सांगण्यावरुन कर्जदार मुलीला घेऊन गेला. मुलगी भीक मागून रोज 100 रुपये आणायची आणि त्याला द्यायची. आतापर्यंत तिने 4500 रुपये दिले आहेत. दरम्यान, त्याच्या 6 वर्षाच्या भावाने तिला तेथून बाहेर काढले आणि कोटा येथे नेले. दोघेही रेल्वे कॉलनी परिसरात फिरत असल्याचे पाहून नगरसेवकाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी दोघांची चौकशी करून त्यांना बाल कल्याण समितीकडे नेले. समिती सदस्य अरुण भार्गव यांनी मुलांचे समुपदेशन केले तेव्हा ही लाजीरवाणी बाब समोर आली.

हे सुद्धा वाचा

मुलाने सांगितले की, त्याची आई अपंग आहे आणि वडिलांना दारुचे व्यसन आहे. उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी त्यांनी बहिणीला गहाण ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, ग्रामीण आणि शहर विभागाचे एसपी बालकल्याण समितीकडे आले होते. याप्रकरणी पोलीस आरोपी बाप आणि भीक मागायला लावणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करणार असल्याचे अरुण भार्गव यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.