नवनीत राणा यांच्या वडिलांना न्यालयाचा झटका, जात प्रमाणपत्र प्रकरणातील याचिका न्यायालयाने फेटाळली !

या फरार घोषित करण्याच्या प्रक्रिये विरुद्ध सत्र न्यायालयात दाद मागत अटक होण्याच्या भीतीपोटी आपण कोर्टासमोर येत नसल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

नवनीत राणा यांच्या वडिलांना न्यालयाचा झटका, जात प्रमाणपत्र प्रकरणातील याचिका न्यायालयाने फेटाळली !
नवनीत राणा यांच्या वडिलांना न्यायालयाचा झटकाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 6:03 PM

मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांना न्यायालयाचा झटका बसला आहे. हरभजन सिंह कुंडलेस यांच्या विरुद्ध सुरू असलेली फरार घोषित करण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठीची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. शिवडी कोर्टाने 30 जानेवारीला कुंडलेस यांच्या विरुद्ध फरार घोषित करण्याची प्रक्रिया शुरू केली होती. याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन देखील कुंडलेस बहुतेक वेळा सुनावणीला गैरहजर राहिले. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढून देखील त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. असं असताना शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने अखेर त्यांच्या विरोधात फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

कोर्टासमोर हजर न झाल्यास मालमत्ता होऊ शकते जप्त

या प्रकरणी जर कुंडलेस महिनाभरात कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची मालमत्तेची जप्ती देखील केली जाऊ शकते. दरम्यान या फरार घोषित करण्याच्या प्रक्रिये विरुद्ध सत्र न्यायालयात दाद मागत अटक होण्याच्या भीतीपोटी आपण कोर्टासमोर येत नसल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं.

काही दिवसात प्रकरणाचा अंतिम निकाल अपेक्षित

2014 सालापासून सुरू असलेल्या खोट्या जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस हे दोघे आरोपी असून, त्यांच्या विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालय गाठलं. येत्या काही दिवसात या प्रकरणाचा अंतिम निकाल येणे अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.