14 वर्षाच्या मुलीला वडिलांनी दाखवला ‘नको तो व्हिडीओ’, आईने घेतल्या भूमिकेचं लोकांनी केलं कौतुक
सध्या एक नवं प्रकरण उजेडात आलं आहे. आई घरी नसताना वडिलांनी मुलीला नको तो व्हिडीओ दाखवला आहे. त्यानंतर आईन घेतलेल्या भूमिकेचं लोकांनी कौतुक केलं आहे.
राजस्थान : राजस्थान (Rajsthan) राज्यातील पाली (Pali) जिल्ह्यात एक धक्कादायक घडली आहे. त्यामुळे नागरिक अधिक संतप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. एका बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ (video) दाखवला आहे. ज्यावेळी कामावर गेलेली आई घरी आली, त्यावेळी मुलीने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. चिडलेल्या आईने मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याच्या नावाने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं. ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला कोर्टात दाखल केलं. त्यावेळी कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
सध्याचा प्रकार पाली जिल्ह्यातील औद्योगिक नगरातील आहे. मागच्या आठवड्यात एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तसं पत्र दिलं होतं. त्या महिलेने पत्रात लिहीलं होतं की, तिचा नवरा खासगी शाळेत शिक्षक आहे. तरी सुध्दा त्यांची बायको मजुरीचं काम करते. त्यांना तीन मुलं सु्ध्दा आहेत. दोन दिवसांपुर्वी ज्यावेळी तिचा पती घरी होता. त्यावेळी ती कामाला गेली होती.
मुलीला घरात छेडछाड केली
आरोपीने आपल्या मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील फिल्म दाखवली. त्यावेळी त्याची दुसरी दोन बाहेर जेवणासाठी गेली होती. मुलगी एकटी असल्याचं पाहून त्याने व्हिडीओ दाखवला. ज्यावेळी तिचा आई घरात आली, त्यावेळी तिच्या आईला तिने झालेला सगळा प्रकार सांगितला. ज्यावेळी त्या महिलेने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यावेळी पतीने दोघांना धमकी दिली. हा प्रकार तुम्ही कोणाला सांगितला तर तुम्हाला दोघींना संपवून टाकेन.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं
रात्री पत्नी मुलगीला घेऊन शांतपणे झोपी गेली. परंतु सकाळी उठल्यानंतर मुलीला घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना माहिती दिली. पत्नीने दिलेल्या पुराव्यावरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीचं मेडिकल करण्यासाठी त्याला बांगड़ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोर्टाच्या आदेशानुसार आरोपीला जेलमध्ये पाठवलं आहे.