हृदयद्रावक ! मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

नांदेडच्या बिलोली तालुक्यात एका 17 वर्षीय मुलाने मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. त्याच्या वडिलांना या घटनेचा इतका धक्का बसला की त्यांनीही आत्महत्या केली. हे दुःखद प्रकरण मोबाईल व्यसनाच्या धोक्याकडे लक्ष वेधते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे आणि मोबाईलच्या अतिवापराविषयी चर्चा सुरू झाली आहे.

हृदयद्रावक ! मोबाईलसाठी तगादा लावत 17 वर्षांच्या मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 9:37 AM

मोबाईल.. आजच्या युगात आपल्याच शरीराचा एक भाग झालेलं हे गॅजेट. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल दिसतो, बरेच लोका सकाळपासून संध्याकाळापर्यंत मोबाईलमध्ये गुंतलेलं दिसतात, एवढं त्याचं व्यसन लागलेलं असतं. पण याच मोबाईलच्या मोहापायी एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची दुर्दैवी आणि तितकीच हृदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे. वडिलांकडे मोबाईलचा तगादा लावत त्या वेडापायी एका 17 वर्षांच्या मुलाने त्याचं मौल्यवान आयुष्य संपवलं, मोबाईलसाठी त्या मुलाने आत्महत्या केली. मात्र त्या कुटुंबाचं दुर्दैवं तेवढंच नव्हतं तर मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे वडील एवढे हादरले की त्यांनीही टोकाचा निर्णय घेतला. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहून त्याच्या वडिलांनीसुद्धा आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून कुटुंबावर तर दुहेरी मृत्यूमुळे दु:खाचा जबर पहाड़ कोसळला आहे.

दुहेरी मृत्यूने नांदेड हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या बिलोली तालुक्यातील एका गावात हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मोबाईलसाठी 17 वर्षांच्या मुलाने जीव सोडला. घरातील खोलीत गळफास घेऊन त्याने त्याचं अमूल्य आयुष्य संपवलं. मात्र हेप पाहून घरातले हादरलेच. मात्र मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या वडिलांनीही शेतात जाऊन गळफास लावून घेतला आणि स्वत:चं जीवन संपवलं. 17 वर्षांच्या त्या मुलाने मोबाील घेऊन देण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. पण मोबाईल मन मिळाल्याने त्याने आत्महत्या केली, मुलाच्या जाण्याचाने दु:खी झालेल्या वडिलांनीही तोच मार्ग अवलंबला आणि कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटून त्यांनीही आयुष्याचा शेवट केला. ओमकार पैलवार, राजू पैलवार असे आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. यामुळे कुटुंबाला प्रचंड धक्का बसला असून गावातही खळबळ माजली आहे. मोबाईलच्या वेडापायी अनमोल असं आयुष्य संपवणाऱ्या मुलाबद्दल आणि त्याच्या मृत्यूनंतर तोच मार्ग अवलंबणाऱ्या त्या पित्याबद्दल सर्वांनाच दु:ख होत असून हळहळ व्यक्त होत आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.