मुंबईत अतिरेकी हल्ल्याची भीती, कुलाब्यातील छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ

कुलाब्यातील छाबड हाऊस ( ज्यूंचे धर्मस्थळ ) या इमारतीचे गुगल मॅप फोटो या दहशतवाद्यांकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील कुलाब्यातील या इमारतीची सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढविली आहे.

मुंबईत अतिरेकी हल्ल्याची भीती, कुलाब्यातील छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ
chabad houseImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 8:55 PM

मुंबई | 30 जुलै 2023 : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या आयएआयएसच्या दहशतवाद्याकडे दक्षिण मुंबईतील ज्यू लोकांचे धार्मिक स्थळ असलेल्या छाबड हाऊस या इमारतीचे गुगल मॅपचे नकाशे सापडल्याने या इमारतीसह मुंबईतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पंचतारांकित हॉटेल, सीएसएमटी इमारतीसह छाबड हाऊसला टार्गेट केले होते.

पुण्यातील कोंडवा परिसरातून आयसिस या दहदशवादी संघटनेचा एक मॉड्यूल अलिकडेच एनआयएने उद्धवस्त केले होते. या प्रकरणात पाच दहशतवाद्यांना अटक झाली आहे. यात आयसिसचा प्रमुख म्हणून कोंढव्यातील भूलतज्ज्ञ डॉ. अदनान याला जेरबंद केले आहे. अदनान हा आयसिस साठी महाराष्ट्रातील तरुणांना ब्रेन वॉश करुन त्यांची भरती या खतरनाक इसिस संघटनेत करीत होता अशी माहीती उघडकीस आली आहे.  मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या साथीदारांनी मुंबईवर केलेल्या क्रुर दहशतवादी हल्ल्यावेळी टार्गेट झालेल्या कुलाब्यातील छाबड हाऊस ( ज्यूंचे धर्मस्थळ ) या इमारतीचे गुगल मॅप फोटो या दहशतवाद्यांकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील कुलाब्यातील या इमारतीची सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढविली आहे.

मूळचे राजस्थानचे

राजस्थानवर हल्ला करण्याची योजना आखणाऱ्या पुण्यातून अटक झालेल्या दोघा दहशतवाद्यांकडे छाबड हाऊसचे गुगल मॅप सापडले आहेत. मुंबई पोलिसांनाही माहीती मिळाल्यानंतर कुलाब्यातील छाबड हाऊसची सुरक्षा वाढविली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने कोथरुड येथून मोहम्मद इमरान मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी याला पुणे पोलिसांच्या मदतीने अटक झाली आहे. यांच्याकडे चौकशी दरम्यान छाबड हाऊसचे गुगल मॅप सापडला आहे. हे दोन्ही दहशतवादी मूळचे राजस्थानचे रहाणारे आहेत.

ज्यू समाज पुन्हा एकदा निशाण्यावर

मुंबईतील ज्यू समाज पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे हे स्पष्ट झाल्याने छाबड हाऊसजवळ पन्नास पोलिस कॉन्स्टेबल आणि अधिकारी तैनात केले आहेत. मुंबईवर 2008 साली दहा दहशतवाद्यांनी सीएसएमटी इमारत, कामा हॉस्पिटल, ताज आणि ओबेरॉय हिल्टन टॉवर हॉटेल, कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे आणि छाबड हाऊसला टार्गेट करीत नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.