बनावट अपघाताचा डाव फसला, पोलीस, वकील, शिक्षकावर गुन्हा, कसा रचला पैसे लाटण्याचा प्लॅन?

उस्मानाबादेत तीन पोलिसांसह (Police) शिक्षक, वकिलाविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण समोल आले आहे. विमा कंपनीची फसवणूक करणे यांना महागात पडले आहे. CID तपासात ही सर्व बनवाबनवी उघड झाली आहे.

बनावट अपघाताचा डाव फसला, पोलीस, वकील, शिक्षकावर गुन्हा, कसा रचला पैसे लाटण्याचा प्लॅन?
अल्पवयीन मुलीला प्रियकरानेच लुटलं Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 11:30 PM

उस्मानाबाद : विम्याचे (Insurance) पैसे मिळवण्यासाठी अनेकदा खोटी माहिती (Bogus Information) दिल्याचे अनेक प्रकार समोर येतात. उस्मानाबादेतही असाच एक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. मात्र हा प्लॅन ज्यांना आखला आणि ज्यांचा यात सहभाग होता त्यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. कारण त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उस्मानाबादेत तीन पोलिसांसह (Police) शिक्षक, वकिलाविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण समोल आले आहे. विमा कंपनीची फसवणूक करणे यांना महागात पडले आहे. CID तपासात ही सर्व बनवाबनवी उघड झाली आहे. बनावट अपघात दाखवून विमा कंपनीला गंडवणाऱ्या टोळीचा राज्य अन्वेषण विभाग अर्थात CID ने पर्दाफाश केला आहे. यात सर्व उच्चशिक्षितांचा सहभाग असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं प्रकरण काय?

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर 04/2020 कलम 279, 388, 304 (अ) भा.द.वी गुन्ह्यातील मयत महादू लक्ष्मण घोडके रा. बोरामणी ता. दक्षिण सोलापूर यांचा खडकी-वडजी रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता. संबंधित मयताच्या नातेवाईकांनी अपघात विमा मिळवण्यासाठी गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीकडे कोर्टामार्फत दावा दाखल केला होता.संबंधित विमा कंपनीने औरंगाबाद खंडपिटात जनहित याचिका दाखल करुन या अपघात प्रकरणाचा CID कडून पुनर्तपास करावा अशी विनंती केली. त्यानंतर हा भयानक प्रकार उघड आल्याने यातल्या दोषींना दणका बसला आहे.

कुणाविरोधात गुन्हे दाखल

पोलीस हेड कॉनस्टेबल जयराम सोमला राठोड (आता आनंदनगर पोलीस स्टेशन कार्यरत), पोलीस कॉनस्टेबल मंगेश ढाकू चव्हाण (सेवा निवृत्त, सोलापूर), पोलीस कॉनस्टेबल अभिजित अमर गायकवाड (आता सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे कार्यरत) यांच्यासह कोर्टात बनावट दावा दाखल करणारे वकील विजयदत्त लक्ष्मण पाटील (रा. काजळा ता. उस्मानाबाद), सुमन महादू घोडके (रा.बोरामणी ता.द.सोलापूर जि. सोलापूर), बिराप्पा तिप्पन्ना घोडके, (रा.बोरामणी ता.द.सोलापूर जि. सोलापूर), सोमनाथ उर्फ सोमसिंग बिरा उंबरजे (रा.कारंजगाव ता.द.सोलापूर), गणेश दत्तात्रय चेंडके, (सोलापूर) यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्लॅन फसल्याने यांचे पैसे लाटण्याचे पितळ उघडे पडले आहे. आता या प्रकरणात किती मोठी कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अलिकडे असे सर्रास प्रकार समोर येऊ लागले आहेत. विमा कंपन्यांना याची अनेकदा झळ बसते आहे.

विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाविरोधात मोर्चा, गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘शी’ला जातो म्हणाला आणि शौचालयातूनच आरोपी पळाला! कुठं घडली घटना?

Video : पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोर, सीसीटीव्ही असतानाही कसा डल्ला मारला? पाहा

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.