बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीची मुलीसह आत्महत्या, राहत्या घरी पेटवलं

किडनीच्या त्रासाला कंटाळल्यामुळे अस्मिता गुप्ता यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे (Filmmaker Santosh Gupta wife Suicide)

बॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीची मुलीसह आत्महत्या, राहत्या घरी पेटवलं
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 2:34 PM

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांच्या पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 55 वर्षीय अस्मिता गुप्ता आणि 16 वर्षीय सृष्टी गुप्ता या मायलेकींनी राहत्या घरी पेटवून आयुष्य संपवलं. मुंबईतील अंधेरी भागात सोमवारी ही घटना घडली होती. (Filmmaker Santosh Gupta wife and daughter Suicide Set themselves on fire in Mumbai)

राहत्या घरी पेटवलं

अस्मिता आणि सृष्टी या अंधेरी पश्चिमेकडील डीएन नगर भागात राहत होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. अस्मिता यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

सृष्टीचा उपचारादरम्यान मृत्यू

संतोष गुप्ता यांची कन्या सृष्टी 70 टक्के भाजली होती. तिला ऐरोली राष्ट्रीय बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी तिचीही प्राणज्योत मालवली. किडनीच्या त्रासाला कंटाळल्यामुळे अस्मिता यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर आईचे आजारपण पाहून व्यथित झालेल्या सृष्टीनेही आयुष्य संपवल्याची माहिती आहे.

दिग्दर्शक-अभिनेते संतोष गुप्ता

संतोष गुप्ता यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय गदर, घातक, अंदाज़ अपना अपना, बिच्छू, हफ्ता बंध यासारख्या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. याशिवाय तमस, स्वराज, लाल दुपट्टा मलमलका यासारख्या टेलिफिल्म्स, तर टिपू सुलतान, होनी अनहोनी, युग यासारख्या मालिकांमध्येही गुप्तांनी काम केलं आहे. (Filmmaker Santosh Gupta wife Suicide)

जिथे मुलाची आत्महत्या, तिथेच आईनेही आयुष्य संपवलं

ज्या ठिकाणी मुलाने आत्महत्या केली होती, त्याच ठिकाणी आईनेही आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सोलापुरातील गणपती घाट भागात 31 डिसेंबरला तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तीनच महिन्यात त्याच्या माऊलीनेही तिथेच जीव दिला.

गणपती घाट येथील सिद्धेश्वर तलावात महिलेने आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं. 40 वर्षीय मृत महिलेचे नाव शारा भीमराव कोळी असल्याचे समोर आले. त्या सोलापूरमधील जम्मा वस्ती भागात राहत होत्या. त्यानंतर पुढे समजलेल्या माहितीने सर्वच जण हैराण झाले. 31 डिसेंबर रोजी शारा कोळी यांच्या मुलाने गणपती घाट भागातच आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या :

31 डिसेंबरला पोटच्या गोळ्याने आत्महत्या केली, तीन महिन्यांनी तिथेच माऊलीनेही आयुष्य संपवलं

(Filmmaker Santosh Gupta wife and daughter Suicide Set themselves on fire in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.