Thane Crime : मुथ्थुट फायनान्समध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न, संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 25, 2023 | 8:20 AM

चोरी करण्यासाठी चोरटे काय करतील याचा नेम नाही. एखाद्या चित्रपटाला कथा शोभावी अशी घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे.

Thane Crime : मुथ्थुट फायनान्समध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न, संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
उल्हासनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला
Image Credit source: TV9
Follow us on

उल्हासनगर / 25 जुलै 2023 : एखाद्या सिरियलमध्ये शोभावी अशी चोरीची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वच हैराण झाले आहेत. उल्हासनगरमधील मुथ्थुट फायनान्समध्ये फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र दरोडा टाकण्याआधीच ही बाब लक्षात आली आणि पुढील अनर्थ टळला. लॉन्ड्रीच्या दुकानातील भिंतीला भगदाड पाडून बँक लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

उल्हासनगरच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीसमोर मुथ्थुट फायनान्स बँक आहे. या कंपनीत दरोडा टाकण्याची तयारी काही दरोडेखोर करत होते. यासाठी दरोडोखोरांनी फिल्मी स्टाईलने तयारी केली होती. यासाठी त्यांनी बँकेच्या शेजारी असलेल्या लाँड्रीच्या दुकानातील भिंतीला भगदाड पाडून बँकेत जाण्यासाठी मार्ग बनवला होता. चोरट्यांनी सर्व तयारी केली होती. मात्र दुकान मालकामुळे हा प्रयत्न फसला.

‘असा’ फसला प्रयत्न

दुकान मालक शांती कानोजिया यांनी सोमवारी सकाळी दुकान उघडताच दुकानात भगदाड पडल्याचे दिसून आले. हे भगदाड शेजारच्या मुथ्थुट फायनान्स बँकेच्या दिशेने गेले होते. यावरुन गुन्हेगारी कटाच्या उद्देशाने हे भगदाड केल्याचे त्यांच्या लक्षात आले. कनोजिया यांनी तात्काळ उल्हासनगर पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलीस आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.