नाशिकमध्ये पहाटेच्या वेळी पुन्हा अग्नितांडव, कामगारांनी पळ काढल्याने वाचले पण…

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली असून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

नाशिकमध्ये पहाटेच्या वेळी पुन्हा अग्नितांडव, कामगारांनी पळ काढल्याने वाचले पण...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 1:04 PM

नाशिक : नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. नाशिक-पुणे महामार्गावर बसला आग लागल्याची घटना होऊन काही तास उलटत नाही तोच एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. याच दरम्यान या फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली असून आगीत मात्र लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. नाशिकच्या वडनेर-पाथर्डी रोड वर ही घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण मॉलसह भंगार गोदाम जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीच्या वेळी लागलेल्या या आगीच्या घटनेत अग्निशमन दलाने मोठी कसरत करत ही आग आटोक्यात आणली होती. धुराचा वास येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती कळवत पाचारण केले होते.

नाशिक शहर परिसर आणि महामार्गावर गेल्या काही दिवसांत आगीच्या घटना वारंवार घडत आहे.

मागील महिन्यात खाजगी बसला अपघात झाल्यानंतर बसला लागलेली आग आणि त्यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

हे सुद्धा वाचा

बुधवारी नाशिक पुणे महामार्गावर चालत्या बसला आग लागल्याने बस संपूर्ण जळून खाक झाली होती त्यात सुदैवाने प्रवाशांच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या दोन्ही घटना ताज्या असतांना नाशिक शहर हद्दीतील वडनेर पाथर्डी रोड येथे फर्निचर मॉल आणि भंगार गोदामाला आग लागली होती.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली असून वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मध्यरात्रीच्या वेळी आग लागल्याने ही बाब कामगारांच्या देखील लक्षात आली नव्हती, मात्र झोपेत असलेल्या कामगारांना आगीची झळ बसताच त्यांनी पळ काढला.

दरम्यान, ही आगीची घटना धडत असतांना धुरामुळे वास येऊ लागला होता, काही घरे जवळ असल्याने त्यांनाही याची झळ बसली आहे.

नाशिकरोड येथील अग्निशमन दलाला ही माहिती देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळवले होते

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.