कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादावेळी गोळीबार, पाच जण जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील मांडरे गावात गणेशोत्सवनिमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेवणाच्या पंगतीत पिण्याचे पाणी देण्यावरुन वाद झाला. या वादाचे नंतर हाणामारीत रुपांतर झाले.
कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादावेळी गोळीबार (Firing) केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील मांडरे गावात घडली आहे. जेवणाच्या पंगतीत पिण्याचे पाणी देण्यावरुन वाद (Dispute) झाला. या हाणामारीत 5 जण जखमी (Injured) झाले आहेत. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
पंगतीतील मानापनाच्या नाट्यातून हाणामारी
कोल्हापूर जिल्ह्यातील मांडरे गावात गणेशोत्सवनिमित्त महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. महाप्रसादाच्या पंगतीत अगरबत्ती लावत पाणी वाटप करण्याची परंपरा आहे. याच पाणी वाटपावरुन मानपानाचे नाट्य रंगले आणि दोन गटात हाणामारी झाली.
गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
यावेळी संशयित अभिजीत पाटील याने उदय पाटील नामक व्यक्तीवर गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदय पाटील बाजूला झाल्याने ते बचावले. तर काहींनी काठ्या, दगडाने जोरदार हाणामारी केली. या हाणामारीत 5 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जखमी आणि आरोपींची नावे खालीलप्रमाणे
उदय पाटील, संग्राम पाटील, रंगराव पाटील, अनिल पाटील आणि रोहित पाटील अशी हाणामारीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. अभिजित सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासाहेब श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहुल कृष्णांत पाटील आणि तुषार राजाराम पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.