Amaravati Firing : अमरावतीत तरुणांच्या वादातून गोळीबार, शाळकरी मुलीला लागली गोळी, पोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह

अमरावतीमध्ये तरुणांच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या गोळीबारात शाळेतून घरी जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थीनीच्या पायाला गोळी लागली आहे. अमरावतीच्या पठाणचौक चाराबाजार परिसरात ही घटना घडलीय.

Amaravati Firing : अमरावतीत तरुणांच्या वादातून गोळीबार, शाळकरी मुलीला लागली गोळी, पोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गोळीबारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:15 PM

अमरावती : आधीच दंगलीमुळे देशभरात चर्चेत आलेल्या अमरावतीमधील (Amravati) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. कारण अमरावतीमध्ये तरुणांच्या वादातून गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या गोळीबारात शाळेतून घरी जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थीनीच्या पायाला गोळी लागली आहे. अमरावतीच्या पठाणचौक चाराबाजार परिसरात ही घटना घडलीय. जखमी विद्यार्थीनीवर सध्या खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

तरुणावर झाडलेली गोळी चुकून मुलीला लागली

दोघा तरुणांचा आपापसात आधीपासून वाद होता. दोघे तरुण पठाणचौक चाराबाजार परिसरात आमनेसामने आले. यावेळी जुन्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळी झाडली. मात्र यादरम्यान 13 वर्षीय मुलगी तेथून चालली होती. तरुणाने झाडलेल्या गोळीचा नेम चुकला आणि तेथून जात असलेल्या या मुलीच्या पायला गोळी लागली. यात मुलीच्या पायाला दुखापत झाली असून, तिला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. आरोपींबाबत अद्याप स्पष्ट माहिती कळू शकली नाही. याप्रकरणी मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (firing in amravati in youth dispute school girl shot question of law and order in the city)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.