पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळाला, चार महिला पतीला सोडून गेल्याची तक्रार; काय आहे प्रकरण?
डुडाचे अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी नोटीस पाठवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु, चार महिलांच्या पतीने सांगितले की, त्यांच्या पत्नी हप्ता मिळाल्यानंतर प्रियकरासोबत फरार झाल्या.
लखनौ : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) चार महिलांनी योजनेचा पहिला हप्ता ५० हजार रुपये उचलला. पहिला हप्ता मिळताच चार महिला पतीला सोडून (Left Husband) प्रियकरासोबत फरार (Absconded with Lover) झाल्या. पतींनी तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला. जिल्हा नगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरू केलाय. योजनेचा हप्ता जारी झाल्यानंतर बांधकाम सुरू न केल्याने ४० लाभार्थींना नोटीस देण्यात आले. यापैकी चार महिलांच्या पतींनी हा खुलासा केला. चारही महिलांच्या पतींनी तक्रार केली की, आता हप्ता पाठवू नका. कारण पहिला हप्ता हा त्यांनी पत्नींनी घेऊन प्रियकरांसोबत पळ काढला.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरबांधकामासाठी सरकारकडून मदत केली जाते. पहिला हप्ता ५० हजार रुपये देण्यात आला. नगरपंचायत बंकी, सिद्धौर, रामनगर व बेलहार येथील चार महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पाठविण्यात आला.
नोटीस पाठवून काम सुरू करण्याचे आदेश
डुडाचे अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी नोटीस पाठवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु, चार महिलांच्या पतीने सांगितले की, त्यांच्या पत्नी हप्ता मिळाल्यानंतर प्रियकरासोबत फरार झाल्या. दुसरा हप्ता पाठवू नका. अधिकाऱ्यांनी या महिलांकडून रिकव्हरी करण्याचे आदेश दिलेत.
कित्तेक लोकांनी हप्ता घेऊन काम सुरू केलेच नाही
पीएम आवास योजनेचे शहर जिल्हा समन्वयक शिवय विश्वकर्मा यांनी सांगितलं की, या योजनेअंतर्गत १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला हप्ता दिला गेला. त्यापैकी ४० लोकांनी पहिला हप्ता घेऊनही काम सुरू केले नाही. चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, यापैकी चार महिला पहिला हप्ता मिळाल्यानंतर पतीला सोडून पैसे घेऊन प्रियकरांसोबत फरार झाल्या.
संबंधित महिलांकडून रिकव्हरीचे आदेश
नगर पंचायत बेलहरा, रामनगर, सिद्धौर आणि बंकी येथे ही घटना समोर आली. चार महिला पैसे घेऊन फरार झाल्याचं त्यांच्या पतीचं म्हणण आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रारही दिली आहे. आता या महिलांचा शोध सुरू आहे. त्या सापडल्यास त्यांच्याकडून पैसे रिकव्हर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.