‘मांडूळ’ विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना अटक, तीन मांडूळ जप्त

| Updated on: Apr 27, 2022 | 12:51 PM

दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंदाजे पाच लाख रुपये किंमत असलेले तीन मांडूळ विक्रीसाठी घेऊन आलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मांडूळ विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपींना अटक, तीन मांडूळ जप्त
मांडूळाची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक
Follow us on

मुंबई : दादर (Dadar) सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंदाजे पाच लाख रुपये किंमत असलेले तीन मांडूळ विक्रीसाठी घेऊन आलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी (police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात वन्यजीव (Wildlife) संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आल्याचे समजताच आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांसमोर त्याची डाळ काही शिजली नाही. अखेर पोलिसांनी या पाचही आरोपींना जेरबंद करत बेड्या ठोकल्या आहेत. दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करून त्याला विक्रीसाठी आणणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी मांडूळ विकण्यासाठी आले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

असे झाले आरोपी जेरबंद

दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण मांडूळ सापाची तस्करी करून ते विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मुंबई- गोवा माहामार्गावरील जिते गावाजवळ असलेल्या एका हॉटेल परिसरात हे आरोपी चारचाकीमधून मांडूळ विक्रीसाठी घेऊन आले. पोलिसांना संबंधीत व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पकडले मात्र यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींना त्यात यश आले नाही. अखेर या पाचही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.

तीन मांडूळ जप्त

दरम्यान अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तीन मांडूळ जप्त केले आहेत. या मांडूळाची पाच लाखांना विक्री होणार होती अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिला. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यद्वारे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  मांडूळ हा एक सापाचा प्रकार आहे. मांडूळबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने या सापाला मोठी मागणी आहे. त्यामुळे मांडूच्या तस्करीचे प्रमाण देखील मोठे आहे. तस्करीमुळे दिवसेंदिवस या सापाची संख्या कमी होत आहे.