देव दर्शनाला गेले होते पाच मित्र, भरधाव ट्रकने समोरुन कारला धडक दिली अन् मैत्रीचा करुण अंत

बिकमसरा गावात सुरभि हॉटेलजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पाचही मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे.

देव दर्शनाला गेले होते पाच मित्र, भरधाव ट्रकने समोरुन कारला धडक दिली अन् मैत्रीचा करुण अंत
बस आणि कार अपघातात तीन तरुण ठारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 1:57 PM

फतेहपूर : राजस्थानमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच मित्रांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवदर्शनाला गेलेल्या मित्रांच्या कारला राजस्थानमधील फतेहपूर शेखावटी येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अजय कुमार, अमित कुमार, संदिप, मोहनलाल आणि संदिप सिंह अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाच तरुण मित्रांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाचही मित्र कारने देव दर्शनाला गेले होते

हरियाणातील फतेहबाद येथे रहिवासी असलेले अजय कुमार, अमित कुमार, संदिप, मोहनलाल आणि संदिप सिंह हे पाच जण आपल्या कारने सालासर बालाजी दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असतानाच आज सकाळी फतेहपूर शेखावटीजवळ भीषण अपघात घडला.

भरधाव ट्रकने कारला धडक दिली

बिकमसरा गावात सुरभि हॉटेलजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पाचही मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. तसेच ट्रकचेही नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करत पाचही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.