Mumbai Crime : दीड कोटींच्या हिऱ्यांचे स्मगलिंग करणाऱ्याला एअरपोर्टवर अटक, आरोपीची नामी शक्कल पाहून पोलीसही हैराण

दीड कोटी रुपयांच्या हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. ते हिरे लपवण्यासाठी त्याने जी शक्कल लढवली होती, ते पाहून सर्वच हैराण झाले.

Mumbai Crime : दीड कोटींच्या हिऱ्यांचे स्मगलिंग करणाऱ्याला एअरपोर्टवर अटक, आरोपीची नामी शक्कल पाहून पोलीसही हैराण
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:45 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : दक्षिण मुंबईतील नळ बाजार येथील एका व्यक्तीला हिऱ्यांचे स्मगलिंग (diamond smuggler) अथवा तस्करी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही कारवाई केली असून त्याच्याकडे दीड कोटी (1.5 crore rupees) रुपये किमतीचे हिरे सापडल्याचे समजते. ते हिरे लपवण्यासाठी त्याने जी शक्कल लढवली होती, ते पाहून अधिकाराही हैराण झाले.

मुक्कीम रझा अश्रफ मन्सुरी असे त्या व्यक्तीचे नाव असून तो बुधवारी दुबई येथून स्पाईसजेटच्या फ्लाईटने मुंबईत पोहोचला. तेव्हा कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिटने त्याला अडवले. त्याच्या हातात असलेल्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये एका बड्या ब्रँडचे चहा पावडरचे पाकीट सापडले. ते जप्त करून त्याची तपासणी करण्यात आली. ते पॅकेट उघडल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना आठ छोटे पाउचेस सापडले, ज्यामध्ये 34 हिरे होते.

त्यानंतर अधिकार्‍यांनी बीकेसी येथील कार्गो क्लिअरन्स सेंटरमधील जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने नामांकित केलेल्या व्हॅल्युअरला तेथे बोलावले. सामानात सापडलेल्या हिऱ्यांचे वजन 1,559.68 कॅरेट्स इतके होते आणि त्यांची किंमत 1.49 कोटी रुपये इतकी होती. त्यानंतर एआययू (AIU) अधिकाऱ्यांनी ते हिरे जप्त केले आणि हिऱ्यांची तस्करी करणाारा आरोपी मन्सुरी याला अटक केली.

त्याची कसून चौकशी करण्यात आली असता चहाच्या पावडरीच्या पॅकेटमध्ये हिरे लपवून ठेवण्यात आले होते, याची आपल्याला कल्पना होती, असे मन्सुरी याने कबूल केले. या कामासाठी त्याला 5 हजार रुपये देण्याचे वचन मिळाले होते, असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.