धक्कादायक! तब्बल ४२ दिवस मुलीचा मृतदेह बापानं जतन का केला?
मुलीने आत्महत्या केली म्हणून वडिलांना फोन करून माहिती पोलीसांनी दिली होती, मात्र, कुटुंब पोहचेपर्यंत पुरावे नष्ट केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह (Deathbody) जतन केल्याची बाब समोर आली आहे. मृत्यूनंतर तब्बल ४२ दिवस उलटून गेल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबामाघे संपूर्ण गाव उभे राहिले असून प्रशासनाच्या विरोधात एकवटले आहे. मुलीला आपल्याच घराच्या शेजारी खड्डा खोदून मीठात पुरून ठेवले आहे. मुलीवर बलात्कार (Rape) करून तिचा खून (Murder) केल्याचा आरोप करत तिच्यावर अन्याय झालाय, त्यामुळे पुन्हा शवविच्छेदन करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.
०१ ऑगस्ट रोजी नंदुरबार येथील धडगाव खडक्या गावातील एका मुलीने आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
मुलीने आत्महत्या केली म्हणून वडिलांना फोन करून माहिती पोलीसांनी दिली होती, मात्र, कुटुंब पोहचेपर्यंत पुरावे नष्ट केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
वावी येथे मुलीचा मृतदेह आढळून आल्याने तेथील ग्रामस्थांच्या मदतीने मुलीच्या मृत्यूबद्दल पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे.
चार व्यक्तींनी आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे सांगत तिचा खून झाल्याचे सांगितले तरी आत्महत्येचाच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थ एकवटले आहे.
पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला असून आत्महत्येच्या गुन्ह्यात तपासानुसार कलम समाविष्ट करू असे आश्वासन दिले आहे.
काय आहे पीडितेच्या वडिलांची मागणी-
मुलीवर बलात्कार झाला असून त्यानंतर तिचा खून करण्यात आला आहे. शवविच्छेदन झाले त्या अहवालात तिच्यावर झालेले अत्याचाराचा उल्लेख नाहीत. मृत्यूपूर्वी तीची ऑडिओक्लिप व्हायरल झाली त्याचा पोलीसांनी तपास का केला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप वडील करत असून पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी आहे.