गुजरातमध्ये डीआरआयची मोठी कारवाई, मुंद्रा पोर्टमधून जप्त केला ‘हा’ करोडोंचा साठा

सिगारेटबाबतची ही यंदाची चौथी मोठी कारवाई आहे. याप्रकरणी सीमा शुल्क अधिनियम अंतर्गत डीआरआयने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

गुजरातमध्ये डीआरआयची मोठी कारवाई, मुंद्रा पोर्टमधून जप्त केला 'हा' करोडोंचा साठा
गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर डीआरआयची कारवाईImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 10:36 PM

गुजरात : डीआरआयने गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर (Mundra Port Gujrat) मोठी कारवाई केली आहे. परदेशी ब्रांडच्या सिगारेटचा मोठा साठा असलेला कंटेनर गुरुवारी डीआरआयने जप्त (Cigarettes Stock Seized) केला आहे. या कंटेनरमध्ये मॅन्चेस्टर ब्रँडच्या सिगारेटचे (Manchester brand cigarettes) 850 बॉक्स जप्त केले आहेत. या सिगारेटची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 17 कोटी रुपये आहे. सिगारेटबाबतची ही यंदाची चौथी मोठी कारवाई आहे. याप्रकरणी सीमा शुल्क अधिनियम अंतर्गत डीआरआयने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

मॅन्चेस्टर ब्रँडच्या सिगारेट जप्त

गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गुरुवारी डीआरआयने मोठी छापेमारी केली. या छापेमारीत डीआरआयने 85,50,000 मॅन्चेस्टर ब्रँडच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. यासंदर्भात आयातकर्ताची चौकशी सुरु आहे. तपासाअंतीच या सिगारेटची डिलिव्हरी कुणाकडे करण्यात येणार होती, हे उघड होईल.

सप्टेंबरमध्ये 18 कोटींची सिगारेट जप्त

डीआरआयने गेल्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये मुंद्रा पोर्टवर कारवाई करत 18 कोटींची ई-सिगारेट जप्त केली होती. या सर्व सिगारेट कंटेनरमध्ये लपवण्यात आल्या होत्या. कंटेनरमध्ये मॉब, मालिशचे तेल, एलसीडी आणि काही बॉक्स ठेवण्यात आले होते. यामागे सिगारेटचे बॉक्स लपवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

छापेमारीत संपूर्ण कंटेनरमधील माल तपासला असता ई-सिगारेटचे 251 बॉक्स आढळून आले. यामध्ये 2 लाख ई-सिगारेट होत्या. या सर्व सिगारेट चीनमध्ये तयार करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षभरात डीआरआयने एकूण 100 कोटींच्या सिगारेट जप्त केल्या आहेत.

सूरतजवळ 4 सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत डीआरआयने 20 कोटींची ई-सिगारेट जप्त केली होती. एका ट्रकवर कारवाई करत ही सिगारेट जप्त करण्यात आली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.