Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशी तरुणीचा कराडमध्ये धिंगाणा, जीप चोरुन पळवली, दहा जण थोडक्यात वाचले

चिपळूनच्या दिशेने बाईकवरुन आलेल्या परदेशी तरुणीने पाटण नवा रस्ता भागात जीप पळवून धुडगूस घातला.

परदेशी तरुणीचा कराडमध्ये धिंगाणा, जीप चोरुन पळवली, दहा जण थोडक्यात वाचले
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 9:05 AM

कराड : अंमली पदार्थाच्या सेवनानंतर परदेशी तरुणीने कराड-चिपळूण रोडवर धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे. आधी बाईक, त्यानंतर रस्त्यावर उभी असलेली जीप पळवून तिने कराडपर्यंत अनेकांना धडका दिल्या. कराडजवळ जीप पलटी झाल्यानंतर हा थरार संपला. परदेशी तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. (Foreigner Girl steals Jeep in Karad ran into several locals)

साताऱ्यात परदेशी युवतीने जीप चोरुन भररस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार काल (रविवारी) रात्री घडला. मूळ नेदरलँडच्या असलेल्या पावलीन कोरनेलिया जिसजे या तरुणीने अंमली पदार्थाची नशा केल्याची प्राथमिक माहिती आहे. कराडच्या कृषी महाविद्यालयाजवळ जीप उलटल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि पाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

चिपळूनच्या दिशेने बाईकवरुन आलेल्या परदेशी तरुणीने पाटण नवा रस्ता भागात धुडगूस घातला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. या तरुणीने जवळच्या दुकानासमोर उभी असणारी महिंद्रा जीप पळवून कराडच्या दिशेने पोबारा केला.

जीपचा वेग ताशी शंभरच्या पलिकडे होता. वाटेत तिने अनेकांना जोरात कट मारले तसेच दहा ते बारा जण थोडक्यात बचावले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अखेर कराडमधील कृषी महाविद्यालयात एका वॅगन आर गाडीला धडक देऊन तिची जीप उलटली.

कराड पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. अटकेची प्रक्रिया करुन तिला आज न्यायालयात हजार केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फक्त अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

(Foreigner Girl steals Jeep in Karad ran into several locals)

मुंबईत ‘खिडकी’ मद्यपी अटकेत

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकन दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. मागील खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत दोन युवक मद्यपान करत असल्याचं यामध्ये दिसत होतं. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करुन त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबरला मध्यरात्री जवळपास एक वाजून 25 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सहारा उड्डाणपुलाजवळ MH 47 AB 6622 या कारमधून धावत्या गाडीच्या दरवाजाबाहेर लटकून मद्यपान करणाऱ्या युवकांचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला होता.

संबंधित बातम्या :

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

(Foreigner Girl steals Jeep in Karad ran into several locals)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.