सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

भारतीय हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सैन्यात आणि रेल्वे विभागात नोकरी देण्याच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 9:34 PM

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सैन्यात आणि रेल्वे विभागात नोकरी देण्याच्या नावावर अनेक लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की आरोपी माजी हवाईदल अधिकारी आहे. त्याने आतापर्यंत अनेक लोकांची फसवणूक केली आहे. चक्रवीर चौधरी असं या आग्रा येथे राहणाऱ्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे (Former Airforce officer arrested in Delhi for cheating in the name of getting jobs in Army and Railway).

विशेष म्हणजे याआधी त्याला हवाई दलातूनही बडतर्फ करण्यात आलं होतं. 2015 मध्ये त्याच्याविरोधात एक गुन्हा देखील दाखल आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. आरोपीविरुद्ध एक अजामिनपात्र वारंटही काढण्यात आलं होतं. मागील वर्षी पोलिसांनी त्याला गुन्हेगार म्हणून घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरु केली होती.

पोलिसांनी सांगितलं, “चौधरी आणि त्याचा सहकारी थान सिंहने नोकरी देण्याचं आमिष दाखवत एक रॅकेटच सुरु केलं होतं. यात जवळपास 18 लोकांना फसवण्यात आलं. या सर्वांना आरोपींनी जवळपास 2.7 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. थान सिंहला नोव्हेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आलं होतं. मात्र, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

संयुक्त पोलीस आयुक्त ओ पी मिश्रा म्हणाले, “तपासात आरोपीने आपल्या सहकाऱ्यासोबत मिळून विद्यार्थ्यांना हवाई दलात आणि रेल्वेत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं तयार करण्यात आली होती. चक्रवीर चौधरीला उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातून अटक करण्यात आलं. तो आपल्या वडिलोपार्जित गावी रिठोरा येथे राहत होता.” विशेष म्हणजे चौधरीची अन्य दोन प्रकरणांमध्ये देखील चौकशी सुरु आहे.

हेही वाचा :

आकर्षक व्याज आणि बोनसचं आमिष, गुंतवणूकदारांचे 35 कोटी घेऊन संचालक फरार; नागपूर पोलिसांकडून शोध सुरु

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा

पाच बायकांची हौस भागवण्यासाठी लाखोंचा गंडा, नवऱ्याला अटक

Former Airforce officer arrested in Delhi for cheating in the name of getting jobs in Army and Railway

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.