माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या चुलतभावाची आत्महत्या, बंदुकीचा आवाज झाल्यानंतर…
पोलिसांना घटना कळल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले, मयत चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव लिंगराज पाटील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले,
लातूर : माजी गृहमंत्री शिवराज पाटील (Minister Shivraj Patil) चाकूरकर यांच्या लातुर (latur) येथील घरी त्यांचे चुलतभाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतः वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून चंद्रशेखर पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात (hospital) पाठवण्यात आला आहे. या घटनेत संशयास्पद असलेल्या गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
फायरचा आवाज झाल्यानंतर…
चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानी आले. स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून मधून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे हॉलमध्ये आले, तेव्हा चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले
पोलिसांना घटना कळल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले, मयत चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव लिंगराज पाटील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहचले, चंद्रशेखर पाटील यांना अनेक आजार होते. वयोमानानुसार ते आजारांना कंटाळले असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे. चंद्रशेखर पाटील हे शेती पाहत होते. त्यांना दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली आहेत. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली मध्ये होते.