मुंबईत चार बोगस डॉक्टर ताब्यात, वैद्यकीय औषधांचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

| Updated on: Feb 13, 2022 | 1:10 PM

अजून एक बोगस डॉक्टर गायब असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या 5 जणांचा पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे गोरेगाव परिसरातील प्रेम नगरमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

मुंबईत चार बोगस डॉक्टर ताब्यात, वैद्यकीय औषधांचा साठा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
पोलिसांनी कारवाईनंतर जप्त केलेला औषधांचा साठा
Follow us on

मुंबई – मुंबईच्या गुन्हे शाखेकडून (mumbai police) आत्तापर्यंत चांगली कामगिरी केल्याचे वारंवार पाहिले आहे, गुन्हे शाखेकडून नुकतीच गोरेगाव (goregaon) परिसरात छापेमारी केली त्यावेळी चार डॉक्टर (doctor) आणि एका कंपाऊंडरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी सुरू असताना त्यांच्याकडे पोलिसांना हवे असलेले कागदपत्रे न मिळाल्याने पोलिसांना ताब्यात घेतल्याचे समजते. तसेच त्यांना ज्या घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे, तिथून पोलिसांनी मोठ्य़ा प्रमाणात वैद्यकीयसाठी देखील जप्त केल्याचे समजते. जप्त केलेल्या औषधांच्या साठ्यामध्ये अलोपॅथी औषध असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन, सिरप, सिरिंज, आय वी सेट, ट्यूब इत्यादी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच अजून मुंबईत किती बोगस डॉक्टर आहेत त्यांचा शोध देखील घेतला जाणार आहे. डॉक्टरांच्याकडे असलेले बनावट कागदपत्रे सुध्दा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अजून एक बोगस डॉक्टर गायब असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या 5 जणांचा पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यामुळे गोरेगाव परिसरातील प्रेम नगरमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

चौकशीदरम्यान खोटं बोलत असल्याचे निष्पन्न

गोरेगावच्या प्रेम नगर येथील तीन डोंगरी परिसरात डॉक्टर बोगस असल्याची कुणकुण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसर पिजून काढायला सुरूवात केली. सुरूवातीला पोलिसांनी तिथल्या संपुर्ण परिस्थितीचा अंदाज घेतला आणि एकावेळी चौघा डॉक्टारांच्या रूग्णालयात चौकशी लावली. दरम्यान चौघेही खोटं बोलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारण त्यांनी दाखवलेले सगळे प्रमाणपत्र बनावट होती, तसेच त्यांच्याकडे ओरिझनल असं पोलिसांना दाखवायला काहीचं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी 4 बोगस डॉक्टरांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी तिथं असलेल्या एका कंपाऊंडरला देखील ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सर्वेश यादव 31, छोटेलाल राधेश्याम यादव 33, ओम प्रकाश यादव 45 वर्ष, डॉक्टर सपना यादव 29, कंपाउंडर इब्रार ताजमुल सय्यद 24 यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

वैद्याकीयसाठा पोलिसांच्या ताब्यात 

गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन, सिरप, सिरिंज, आय वी सेट, ट्यूब इत्यादी वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत, असे अनेक डॉक्टर मुंबईत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही अनेक डॉक्टरांचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गोरेगावमध्ये कारवाई दरम्यान न सापडलेल्या डॉक्टरचा शोध पोलिस घेत आहेत. तो सापडल्यानंतर अजून किती बोगस डॉक्टर आहेत, हे त्यावरून स्पष्ट होईल.

पतीच्या निधनानंतर खचली, त्यात कर्करोगाने गाठले; भंडाऱ्यातील महिलेने उचलले आत्मघाती पाऊल

Bhandara Crime | बनावट दुचाकी-देशी कट्ट्यासह रात्रीची सफर, घातपाताची शक्यता; दोन आरोपींना भंडारा पोलिसांनी केले जेरबंद