नागपुरात 4 अर्भकं सापडल्याने खळबळ, मोकळ्या मैदानात अर्भकं आली कुठून?
नागपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. कारण नागपूरच्या क्वेटा कॉलोनी परिसरात चार अर्भकं सापडली आहे. मोकळ्या मैदानात चार अर्भक सापडल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.
नागपूर : नागपूर शहरात (Nagpur Crime) एक खळबळजनक घटना घडली आहे. कारण नागपूरच्या क्वेटा कॉलोनी परिसरात चार अर्भकं (Infants) सापडली आहे. मोकळ्या मैदानात चार अर्भक सापडल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे. सहा महिन्याचे अर्भकं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर पोलीस (Nagpur Police) सध्या घटनास्थळी पोहचून या घटनेचा शोध घेत आहेत. ही अर्भक या ठिकाणी आली कुठून याबाबत आता कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र असा धक्कादायक प्रकार घडल्याने नागपूरकरही सध्या चांगलेच शॉकमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच वर्ध्यातही असाच खळबळजनक प्रकार घडला होता, हेही प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात मोठी कारवाईही करण्यात आली आहे. आता पुन्हा या प्रकरणाने राज्यात खळबळ माजवली आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा शोध सुरू
नागपूर पोलीसही या घटनेने हादरून गेले आहेत. नागपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही अर्भकांची संख्या नेमकी किती आहे? याबाबत पोलीस साशंक आहेत, त्यामुळे नेमकी संख्या समजू शकलेली नाहीये. सुरूवातील चार ते पाच अर्भक असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तपास पूर्ण झाल्यानंंतर आणि पूर्ण परिसरात चौकशी केल्यानंतरच पोलीस अर्भकांचा अचूक आकडा सांगू शकतील. वर्ध्यातही काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार घडला होता. वर्ध्यातल्या कदम रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात अर्भक सापडली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं. या प्रकरणात काही डॉक्टर व इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. त्यानंतर हे प्रकरण थंड होतंय तोवर हा दुसरा प्रकार समोर आलाय. यावेळी या घटनास्थली बघ्यांचीही मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
पोलिसांपुढे मोठं आव्हान
या घटनेने नागपूर हादरून गेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अर्भक आली कुठून? या प्रकरणात नेमका कुणाचा हात आहे. वर्ध्यासारखेच या प्रकरणात एखादे रुग्णालय किंवा डॉक्टर यांचा समावेश आहे का? ही अर्भक याठिकाणी कुणी आणून टाकली. ही अर्भक इथे टाकताना आजूबाजूच्या परिसरातील कुणी हा प्रकार पाहिला का? अशा असंख्य प्रश्नांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनही खडबडून कामाला लागले आहे.
मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण