दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात, चौघे जण जखमी

भरधाव वेगातील दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघाताचे माहिती कळताच परिसरातील स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात, चौघे जण जखमी
पुणे-सातारा महामार्गावर अपघातात चौघे जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 9:30 AM

पुणे / विनय जगताप (प्रतिनिधी) : वर्दळीच्या पुणे-सातारा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. भरधाव वेगातील दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघाताचे माहिती कळताच परिसरातील स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. या महामार्गावर एकाच आठवड्यात घडलेला हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे या महामार्गावरील भरधाव ड्रायव्हिंगचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकची धडक

पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत काल सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने एक दुचाकीस्वार चालला होता. यावेळी विरुद्ध दिशेने दुचाकीवरुन तिघे जण येत होते. आऊटसाईडने आलेल्या या दुचाकीने साताऱ्याकडे जाणाऱ्या या दुचाकीला जोरदार धडक दिली. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला महामार्गावर उलट्या दिशेने भरधाव वेगाने येतं असलेल्या ट्रिपल सीट दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात झाला.

अपघातात चौघे जखमी, रुग्णालयात दाखल

या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघे जण जखमी झाले. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी सर्व जखमींना उपाचारासाठी नजीकच्या सिद्धीविनायक रुग्णालयात दाखल केले. एकाच आठवड्यात येथे दुसरा अपघात घडल्याने महामार्गाचा पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वाहनचालकांनीही वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे नगर महामार्गावर कंटेनर आणि कारमध्ये अपघात

पुणे नगर महामार्गावर कारेगावजवळ फलकेमळा येथे कंटेनर आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व कुटुंब हे बीड जिल्ह्यातील असून, एका दोन वर्षाच्या मुलीसह चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.