मेव्हण्याचे लग्न जमवण्यासाठी चालले होते कुटुंब, मात्र घरापर्यंत पोहचलेच नाहीत; कुटुंबासोबत नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन भोंडवे यांच्या मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते आपल्या कुटुंबासह आपल्या इंडिका कारने चाकण येथे चालले होते. फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची कार आदळली.

मेव्हण्याचे लग्न जमवण्यासाठी चालले होते कुटुंब, मात्र घरापर्यंत पोहचलेच नाहीत; कुटुंबासोबत नेमके काय घडले?
शिरुरमध्ये कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:15 PM

शिरूर / सुनील थिगळे (प्रतिनिधी) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे नगर महामार्गावर कारेगाव लगत फलके मळा येथे ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर कारेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अश्विन सुदाम भोंडवे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. बबलू लहरी चौहान असे कंटेनर चालकाचे नाव आहे.

एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृ्त्यू

सुदाम शंकर भोंडवे, सिंधुताई सुदाम भोंडवे, कार्तिकी अश्विन भोंडवे आणि आनंदी अश्वीन भोंडवे अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रहिवासी आहेत. अपघातात कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. अश्विन सुदाम भोंडवे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर कारेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

मेव्हण्याचे लग्न जमवायला चालले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन भोंडवे यांच्या मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते आपल्या कुटुंबासह आपल्या इंडिका कारने चाकण येथे चालले होते. फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची कार आदळली. या अपघातात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर त्यांच्या कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तात्काळ बचावकार्य हाती घेत वाहतूक सुरळीत केली

अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली कार बाहेर काढली. स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी आणि मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.