गडचिरोलीत 22 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
शासनाकडून 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या चार जहाल (Four Naxalites surrender In Gadchiroli) नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
गडचिरोली : शासनाकडून 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या चार जहाल (Four Naxalites surrender In Gadchiroli) नक्षलवाद्यांनी मंगळवारी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलीचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या चारही नक्षलवाद्यांवर खून, जाळपोळ, चकमकी असे विविध गुन्हे दाखल होते, अशी माहिती गडचिरोलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली (Four Naxalites surrender In Gadchiroli On Whom Reward Of Rs 22 Lakh On Naxalites).
1) दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम हा 28 वर्ष वयाचा जहाल माओवादी डिसेंबर 2006 मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होवुन फेब्रुवारी 2007 पासून टिपागड तसेच चातगाव दलममध्ये कार्यरत होता. मार्च 2007 च्या शेवटी प्लाटून क्रमांक 03 मधुन बदली होवुन भामरागड दलममध्ये कार्यरत होता. 2010 ला एसीएम पदावर भामरागड दलममध्ये पदोन्नती झाली. सप्टेंबर 2021 ला दलम कमांडर म्हणुन पदोन्नती दिली आणि डिसेंबर 2018 पर्यंत कमांडर पदावर कार्यरत होता. फरवरी 2019 ला प्लाटुन क्रमांक 07 चे गठण करुन प्लाटुन क्रमांक 07 चे कमांडर बनला. आक्टोबर 2020 पर्यंत भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे 11 गुन्हे , खुनाचे 6 गुन्हे, जाळपोळीचे 3 गुन्हे दाखल असुन शासनाने त्याच्यावर एकूण 08 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
2) नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी हा 35 वर्ष वयाचा माओवादी सप्टेंबर 2002 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन नोव्हेंबर 2003 मध्ये टिपागड दलममधुन बदलून प्लाटुन क्र. -03 मध्ये कार्यरत होता. सन 2006 मध्ये प्लाटुन क्र. 03 चा सेक्शन क.01 चा उपकमांडर तर सन 2008 मध्ये प्लाटुन क्र. 03 चा सेक्शन कमांडर म्हणुन कार्यरत होता. एप्रिल 2007 मध्ये नक्षल सदस्या निला कुमरे हिचेसोबत लग्न केले. त्याचेवर चकमकीचे 09 गुन्हे, 04 खुनाचे, जाळपोळीचे 05 गुन्हे, 01 भूसुरुंग स्फोटाचे गुन्हे दाखल असुन शासनाने आठ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
3) निला रुषी कुमरे ही 34 वर्ष वयाचा माओवादी असुन ती नोव्हेंबर 2005 ला कसनसूर दलम मध्ये सीएनएमएम टिममध्ये सदस्या पदावर भरती होवुन सन 2007 मध्ये नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी प्लाटुन क्र.03 सेक्शन क्र. 01 चा कमांडर याचेसोबत लग्न केले. ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. तिचेवर चकमकीचे 3 गुन्हे, 3 खुनाचे, जाळपोळीचे 4 गुन्हे दाखल असुन, तिच्यावर शासनाने 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
4) शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला हा 26 वर्ष वयाचा माओवादी जानेवारी 2011 ला चातगाव दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन माहे सप्टेंबर 2019 ला पीपीसीएम पदावर पदोन्नती होवून माहे नोव्हेंबर 2020 पर्यंत झोन टिडीला पीपीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत. त्याचेवर चकमकीचे 6 गुन्हे, 2 खुनाचे गुन्हे दाखल असुन, त्याच्यावर शासनाने चार लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळुन वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2020-21 या वर्षांत आजपर्यंत 37 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 2 दलम उपकमांडर, 28 सदस्य, 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली.
घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका, नक्षलवाद्यांचा हत्यारांचा अड्डा उद्ध्वस्त, जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्स https://t.co/PwjJKAp0aE #Naxal | #Gadchiroli | #Maharashtra | #Abujhmad
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2021
Four Naxalites surrender In Gadchiroli On Whom Reward Of Rs 22 Lakh On Naxalites
संबंधित बातम्या :
मला नक्षलवादी व्हायचंय, हवालदिल शेतकऱ्याचं हिंगोली तहसीलदाराकडे निवेदन
नक्षलवादी भागात जेव्हा जवान नृत्य करतात, पाहा व्हिडीओ, अभिमान वाटेल!