चहा पिताच चौघांचा मृ्त्यू, भाऊबीजेच्या दिवशीच कुटुंब शोकात बुडाले; कारण काय?
मैनपुरीतील नागला कन्हई गावात शिवनंदन यांच्या घरी गुरुवारी सकाळी भाऊबीजेची तयारी सुरू होती. फिरोजाबाद येथील रहिवासी असलेले रवींद्र सिंह हे शिवनंदन यांच्या घरी आले होते. यावेळी सगळे जण चहा घ्यायला बसले होते.
मैनपुरी : भाऊबीजेच्या दिवशीच उत्तर प्रदेशातील मैनपुरी (Mainpuri Uttar Pradesh) येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. चहा पिताच (Drink Tea) कुटुंबातील चौघांचा मृत्यू (Four People Death) झाला आहे. मयतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला सैफई रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे औंचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
घरी भाऊबीजेची तयारी सुरु होती
मैनपुरीतील नागला कन्हई गावात शिवनंदन यांच्या घरी गुरुवारी सकाळी भाऊबीजेची तयारी सुरू होती. फिरोजाबाद येथील रहिवासी असलेले रवींद्र सिंह हे शिवनंदन यांच्या घरी आले होते. यावेळी सगळे जण चहा घ्यायला बसले होते.
चहा प्यायल्यानंतर सर्वांची तब्येत बिघडली
चहा प्यायल्यानंतर रवींद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. कुटुंबीयांनी त्यांना सावरेपर्यंत शिवनंदन यांचा सहा वर्षांच्या आणि पाच वर्षांच्या मुलाचीही प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिघांनाही घेऊन जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
तेथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. दुसरीकडे, शिवनंदन आणि सोबरन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सैफईला रेफर करण्यात आले आहे. उपचारादरम्यान सोब्रानचाही मृत्यू झाला.
चहापत्तीच्या जागेवर कीटनाशक पडल्याने घटना घडल्याचा अंदाज
या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. प्रथमदर्शनी चहाच्या पानांऐवजी घरात ठेवलेल्या कीटकनाशकाचा वापर केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चहापत्ती ठेवण्याच्या जागी कीटकनाशक पडल्याने ही दुःखद घटना घडली.
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी विषारी चहापत्ती आणि चहासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीसाठी पाठवल्या आहेत.