Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना संपवले; कुणी खेळला हा खूनी खेळ?

हत्या केल्यानंतर आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून, तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांना संपवले; कुणी खेळला हा खूनी खेळ?
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 5:31 PM

कारवार : संपत्तीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याची घटना कर्नाटकातील हडवल्ली गावाजवळ शुक्रवारी घडली. याप्रकरणी भटकळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विधवा सुनेच्या भावानेच सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांची हत्या केल्याची माहिती मिळते. शंभू व्यंकटरमण भट्ट, मादेवी भट्ट, राघवेंद्र भट्ट आणि कुसुमा राघवेंद्र भट्ट हत्या करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली असून, तिघांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

चौघांचे मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात आढळले

हडवल्ली गाव हे जंगल परिसरात असल्याने तेथे घरे एकमेकांपासून खूप दूर आहेत. शंभू भट्ट यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर आढळून आला. त्यांच्या मुलाचा मृतदेह त्यांच्यापासून सुमारे 25 पावले मागे आढळून आला. तर पत्नीचा मृतदेह एका बाजूला आणि सुनेचा मृतदेह दुसऱ्या बाजूला पडला होता. चौघांचेही मृतदेह घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले.

घटनास्थळी उपस्थित मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मृत शंभू यांचा मोठा मुलगा श्रीधर याचा आठ वर्षांपूर्वी किडनी निकामी झाल्याने मृत्यू झाला होता. श्रीधर भट्ट याची पत्नी विद्या भट्ट हिचे सासरे शंभू भट्ट यांच्याशी मालमत्तेतील वाट्यावरुन वाद होते.

हे सुद्धा वाचा

मोठी सून आणि तिच्या भावावर खुनाचा आरोप

विद्या भट्टचा भाऊ विनय भट्ट याने ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्या आणि तिचे वडील यांचाही या खून प्रकरणात समावेश आहे. मुख्य आरोपी विनय घटनास्थळावरून फरार आहे. खून झाला त्यावेळी मृत राजू भट्ट यांचा सहा वर्षांचा मोठा मुलगा शाळेत गेला होता, तर त्याची तीन वर्षांची मुलगी घरात झोपली होती.ते दोघेही सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती मिळताच कारवारचे एसपी विष्णुवर्धन भटकळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भटकळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्याचे आदेश दिले. भटकळचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत, ग्रामीण परिमंडळाचे पोलीस निरीक्षक चंदन गोपाळ, भटकळच्या सहायक आयुक्त ममता देवी, तहसीलदार अशोक भट्ट यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.