Nagpur Crime : एका ‘आरोपामुळे’ संपलं पचोरी कुटुंब ? नागपूर सामूहिक आत्महत्या प्रकरणाची Inside Story काय ?
नागपूर जवळील मोवाड गावात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आयुष्य संपवल्याने प्रचंड खळबळ माजली होती. सेवानिवृत्त शिक्षक, त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी तडकाफडकी आयुष्य संपवलं. त्यांच्या घरात चौघांचेही मृतदेह गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय ?
नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात काल एका घरात चौघांचे मृतदेह आढळले आणि एकच खळबळ निर्माण झाली. तेथे पचोरी कुटुंबातील चौघांनी गळफास लावून घेत आयुष्य संपवलंय सेवानिवृत्त शिक्षक विजय पजोरी, त्यांची पत्नी मालन, मुलं दीपक आणि गणेश यांनी टोकाचं पाऊल उटलत गळफास घेतला. त्यांचे मृतेदह घरात आढळल्याने प्रचंड खळबळ माजली असून गावात अतिशय भीतीचं वातावरण आहे.
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झाल्यावर समोरचं दृश्य पाहून पोलिसही स्तिमित झाले त्याच चौघांची मृतदेह घरातील चार कोपऱ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी सर्व मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मात्र एका हसत्या खेळत्या कुटुंबाने आत्महत्येसाराखे एवढे भीषण, टोकाचे पाऊल का उचलले की त्यासाठी दुसरं कोणी जबाबदार आहे,असा प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाला
सुसाईड नोट सापडली पण…
त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी पचोरी कुटुंबाचे नातेवाईक तसेच शेजार-पाजारच्यांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली.सतसेच काही क्ल्यू मिळतो का हे पाहण्यासाठी घरातही शोधाशोध सुरू होती. त्याचदरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आणि त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. त्या सुसाईड नोटमध्ये चारही मृतांची स्वाक्षरी असून मृत्यूचे कारणही त्यात नमूद केले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत विजय पचोरी यांच्या एका मुलाविरोधात मध्य प्रदेशातील पंढुरा या सहकारी संस्थेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात त्याला अटकही करण्यात आली होती. महिनाभरापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. फसवणूक प्रकरणात नाव आल्यानंतर सर्वजण खूप अस्वस्थ झाले आणि त्या त्रासामुळे सर्वांनी आत्महत्या केली, असे त्या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित
मात्र एका मुलावर आरोप लागला आणि गुन्हा दाखल होता तर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या का केली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कुटुंबावर काही दबाव होता का? कोणी त्यांना इतका त्रास दिला होता किंवा डिवचलं होतं दिली होती का, की त्या त्रासामुळे कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा एवढा टोकाचा निर्णय घेतला ? आणि चिठ्ठी लिहून ठेवली, ज्यामुळे ही हत्या नव्हे तर आत्महत्या भासेल ? या सामूहिक आत्महत्येप्रकरणी आता पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून माहिती घेत आहे. गरज भासल्यास याप्रकरण मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेतली जाईल आणि सहकारी बँकेशी संबंधित फसवणूक प्रकरणातील कोणी या मृत्यूस जबाबादार आहे का, त्याचाही शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितलं.