Family Death : एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये चार वर्षाच्या बालिकेचाही समावेश; नेमके काय घडले?

विविनचा मृतदेह बेडरुममध्ये लटकलेला आढळला. तर पत्नी, आई आणि मुलीचा मृतदेह दुसऱ्या बेडरुममध्ये आढळले. प्राथमिक तपासात कुटुंबाने आत्महत्या केल्याचे कळते. पोलीस तपासाअंतीच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Family Death : एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये चार वर्षाच्या बालिकेचाही समावेश; नेमके काय घडले?
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 9:28 PM

हैदराबाद : एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळल्याने हैदराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पती, पत्नी, आई आणि चार वर्षाच्या मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. विविन प्रताप, सिंधुरा, जयंती अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. विविनचा मृतदेह बेडरुममध्ये लटकलेला आढळला. तर पत्नी, आई आणि मुलीचा मृतदेह दुसऱ्या बेडरुममध्ये आढळले. प्राथमिक तपासात कुटुंबाने आत्महत्या केल्याचे कळते. पोलीस तपासाअंतीच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

पती-पत्नीमध्ये नोकरीवरुन सुरु होता वाद

विविन प्रताप चेन्नईत मर्सिडीज बेन्झ कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करत होता. तर पत्नी सिंधुरा हैदराबादमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरी करत होती. विविन पत्नीला चेन्नईत बदली करुन घेण्यासाठी सांगत होता. मात्र पत्नी बदली करुन घ्यायला नकार द्यायची.

तपासाअंतीच खरे कारण स्पष्ट होईल

यावरुन कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासातून वर्तवला आहे. मात्र अधिक तपासानंतरच सत्य काय आहे याचा खुलासा होईल. फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

पुण्यातही आर्थिक अडचणीतून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

आर्थिक नुकसान झाल्यामुळे पुण्यातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. शेजाऱ्यांच्या घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.