मुलाची तब्येत बिघडली म्हणून दवाखान्यात नेले, मात्र पुढे जे घडले त्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !

मुलाची तब्येत बिघडल्याने मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्वच चक्रावले.

मुलाची तब्येत बिघडली म्हणून दवाखान्यात नेले, मात्र पुढे जे घडले त्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !
तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडाला अटकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 9:40 PM

फरीदाबाद : स्वतःचे मूल पाहिजे होते म्हणून 4 वर्षाच्या मुलाची सावत्र आईने हत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रेटर फरीदाबादमधील बडौली गावात घडली आहे. हत्या केल्यानंतर आजारपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र शवविच्छेदन अहवालामुळे महिलेची पोलखोल झाली. पोलिसांनी आरोपी सावत्र आईला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. बडौली गावात राहणारे देवीदीन पटेल याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. देवीदीनला पहिल्या पत्नीपासून 9 वर्षाचा आणि 4 वर्षाचा अशी दोन मुलं आहेत.

स्वतःचे मूल हवे होते म्हणून सावत्र मुलाचा काटा काढला

पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांनी शेजारच्या गावात राहणाऱ्या या महिलेशी अडीच वर्षापूर्वी दुसरा विवाह केला. महिलेचाही हा दुसरा विवाह आहे. महिलेला पतीपासून स्वतःचे मूल पाहिजे होते. मात्र पतीला मूल नको हवे होते. या कारणातून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. याच रागातून महिलेने 4 वर्षाच्या सावत्र मुलाला गळा आवळून संपवले.

शवविच्छेदन अहवालानंतर हत्येचा उलगडा

मुलाची तब्येत बिघडल्याने मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्वच चक्रावले. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाला नसून, गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

आरोपी महिलेला अटक

तपासादरम्यान सावत्र आईनेच मुलाची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.