Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशनच्या नावाखाली तोतया डॉक्टरने वृद्धेला फसवलं, लाखो रुपये उकळले

गेल्या काही काळापासून मुंबईत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. विशेषत: वृद्धांना हेरून, त्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अंधेरी येथेही घडली.

ऑपरेशनच्या नावाखाली तोतया डॉक्टरने वृद्धेला फसवलं, लाखो रुपये उकळले
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 8:57 AM

गेल्या काही काळापासून मुंबईत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. विशेषत: वृद्धांना हेरून, त्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अंधेरी येथेही घडली. जेथे ऑपरेशनच्या नावाखाली एका भामट्या, तोतया डॉक्टरने वृद्ध महिलेची फसवणूक केली आणि तिच्याकडून 7 लाखांहून अधिक पैसे उकळले. धक्कादायक गोष्ट म्हणजे जवळपास तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र पीडित महिलेने आत्ता याप्रकरणी तक्रार नोंदवल्याने तीन वर्षांनी हाँ गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीत नोव्हेंबर 2021 मध्ये हा प्रकार घडला. ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरशी संवाद साधत उपचार करून घेण्याचा प्रकार अंधेरीतील 61 वर्षीय महिलेच्या अंगलट आला. डॉ. झफर मर्चंट हा तोतया डॉक्टर आणि त्याचा सहकारी विनोद गोयल यांनी मिळून 2021 च्या नोव्हेंबरमध्ये या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केली होती.

पीडित महिला ही तिच्या आईला घेऊन 2021मध्ये डेन्टिस्टकडे गेली होती. त्यावेळी तेथे त्यांची ओळख विनोद गोयलसोबत झाली. त्यावेळी बोलताना आपल्या आईचे गुडघेही खूप दुखतात असं त्या महिलेने सांगितलं होतं. त्यावेळी आरोपी गोयलने त्यांना एका डॉक्टरचा कॉन्टॅक्ट नंबर देत त्याच्याशी बोलून उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या आईने दिलेल्या नंबरवर कॉल केला असता, समोरील इसमाने आपलं नाव डॉ. झफर मर्चंट असं सांगत ओळख करून दिली.

नंतर त्याने घरी जाऊन तक्रारदार महिलेच्या आईच्या गुडख्यावर साधं ऑपरेशन केलं. ते झाशस्वी झाली आहे असे सांगत त्या महिलेच्या आईच्या गुडघ्याचा त्रासही दूर झाल्याचे सांगितले. शिवाय, उपचारासाठी सात लाख २० हजार रुपये मागितले. तक्रारदार आणि तिच्या आईने सव्वा सात लाख रुपये रोख रक्कम म्हणून दिले. मात्र त्यानंतरही त्या महिलेच्या गुडघ्यातील वेदना काही थांबल्या नाहीत. म्हणून त्यांनी डॉ. मर्चंटला पुन्हा कॉल केला, पण त्यांचा नंबर बंद होता. ज्याच्याकडून नंबर मिळाला त्या विनोद गोयलशीही संपर्क साधला पण त्याने आधी खोटं आश्वासनं दिलं, नंतर फोन उचललाच नाही.

त्याचदरम्यान काही कारणामुळे तक्रारदार महिला तेव्हा पोलिसांत जाऊ शकली नाही. नंतर इतर काही लोकांचीही अशीच फसवणूक झाल्याचे तिच्या कानावर आलं. अखेर तीन वर्षानी तिने याप्रकरणाला वाचा फोडण्याचं ठरवलं आणि ओशिवरा पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. आरोपींनी अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.