तामिळनाडूच्या ठगांचा नागपुरमधील इसमाला गंडा, मुलीला मेडिकलला प्रवेश मिळवून देतो सांगत 52 लाख लाटले

झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारे ओमप्रकाश वंदेवार हे सलुनचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा पास केली, मात्र मार्क कमी असल्याने तिला सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला नाही.

तामिळनाडूच्या ठगांचा नागपुरमधील इसमाला गंडा, मुलीला मेडिकलला प्रवेश मिळवून देतो सांगत 52 लाख लाटले
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो सांगत लाखोंचा गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 4:12 PM

नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : मुलीला वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळवून देतो सांगत एका व्यक्तीला तब्बल 52 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. तामिळनाडूच्या ठगबाजानी नागपूरच्या पालकाला हा गंडा घातला आहे. या प्रकरणी तामिळनाडूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश वंदेवार असे फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने मानकापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींना पकडण्यासाठी पुढील कारवाई करत आहेत.

नीटमध्ये कमी मार्क मिळाल्याने मुलीला प्रवेश मिळाला नव्हता

झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारे ओमप्रकाश वंदेवार हे सलुनचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा पास केली, मात्र मार्क कमी असल्याने तिला सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला नाही.

मेडिकल प्रवेशाच्या प्रयत्नात असताना तामिळनाडूच्या व्यक्तीशी संपर्क

यामुळे मुलीच्या प्रवेशासाठी वंदेवार खाजगी महाविद्यालयात प्रयत्न करत होते. याच दरम्यान वंदेवार यांना मेडिकल प्रवेशाचे काम करणाऱ्या तामिनाडूच्या एका व्यक्तीचा नंबर मिळाला.

हे सुद्धा वाचा

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे सांगत 52 लाख उकळले

या व्यक्तीने त्यांना तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच आमिष दिलं. त्यासाठी ओमप्रकाश यांच्याकडून तामिळनाडूच्या तिघांनी तब्बल 52 लाख रुपये घेतले.

मात्र पैसे देऊनही प्रवेशही मिळाला नाही, यामुळे अखेर नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या तिघांवर गुन्हे दाखल केले असले तरी आरोपींचा शोध घेऊन पैसे परत मिळणार का ? हा प्रश्न आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.